शेगावमध्ये पावणेतीन हजार नागरिकांनी लस घेतली

0
7
  1. शेगाव,संकेत टाइम्स : शेगांव (ता.जत)येथे महालसीकरण मोहिमेत २,७८१ जणांनी लस घेत तालुक्यात उंच्चाक मिळविला.
जत तालुक्यात लसीकरण कमी प्रमाणात झाले आहे,त्यामुळे लसीकरण टक्का वाढविण्याचे आवाहन प्रशासनासमोर होते.जिल्हाधिकारी यांनी केलेल्या आवाहनानुसा महालसीकरणास तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला.यात शेगावमध्ये सर्वाधिक २,७८१ जणांनी लस घेत उंच्चाक नोंदविला.
वैद्यकीय अधिकारी डॉ.हबीब नदाफ,संरपच,उपसंरपच,सामाजिक कार्यकर्ते,आशा वर्कर्स यांनी कष्ट घेतले.
माजी सरपंच व शिवशंभू सहकारी संस्थेचे चेअरमन लक्ष्मण बोराडे यांनी आभार व्यक्त केले.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here