शिवसेनेला गतवैभव आणू | संजय सांवत ; बनाळी मतदार संघात‌ बैठका

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील बनाळी जिल्हा परिषद गटातील बनाळी,अंतराळ,आवंढी, लोहगाव आदी गावामध्ये शिवसेना व युवा सेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेण्यात आल्या.शिवसेनेच्या पक्षवाढीसाठी व काही पदाधिकारी यांचा पक्ष प्रवेश यासाठी या बैठका शिवसेनेचे पश्चिम विभाग तालुकाप्रमुख संजय सावंत व युवासेनेचे पश्चिम विभाग तालुका प्रमुख सचिन मदने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आल्या होत्या.
यावेळी अनेक आजी, माजी सरपंच,ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा करण्यात आल्या.येणाऱ्या काही दिवसांमध्ये अनेक दिग्गजांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होणार असल्याची माहिती संजय सावंत व सचिन मदने यांनी दिली.गाव तिथे शिवसेना व गाव तिथे युवा सेनेच्या शाखा स्थापन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभुते, जिल्हा विस्तार अधिकारी किरण सावंत,युवा सेना जिल्हाप्रमुख अँड. किरण सावंत यांच्या नेतृत्वाखाली लवकरच या शाखांचे उद्घाटने होणार आहेत.
सचिन मदने म्हणाले, गावातील कोणत्याही अडचणी, समस्या असतील तर त्या आमच्यापर्यंत पोहचव्यात.नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कठिबंध्द आहोत.सामान्य जनतेचे प्रश्न सुटले पाहिजेत,असे आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिले आहेत.
त्यामुळे शासनाच्या सर्व योजना तालुक्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचवण्याचे काम आम्ही करत आहोत, असेही मदने म्हणाल्या.
Rate Card
बनाळी जिल्हा परिषद गटात शिवसेना व युवासेनाच्या बैठका संपन्न झाल्या

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.