महाराष्ट्र बँकेच्या संख शाखाधिकाऱ्यांकडून खातेदाराचा छळ

0
जत,संकेत टाइम्स : संख ता.जत येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील शाखाधिकारी यांचा मनमानी कारभार थांबवावा,अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.तसे निवेदन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि,पुर्व भागातील संख या मोठ्या गावात असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र ही एकमेव राष्ट्रीयकृत्त बँक आहे.तेथे अनेक शेतकरी,नोकरदार,बेरोजगार,सामान्य नागरिकांची विविध योजनाची खाती आहेत.त्यामुळे येथे मोठ्या संख्येने खातेदार येतात.त्याशिवाय शेतीसह अनेक कर्जासाठी खातेदार येत आहेत. मात्र या खातेदारांची बँकेचे शाखाधिकारी हेळसाड करतात.त्यांनी कर्जवाटपासाठी एंजन्ट नेमले आहे.
Rate Card
त्यांनी सांगितलेल्यांनाच कर्ज दिले जाते,अन्य जणांना हेलपाटे मारावे लागत आहे. यामुळे शेतकरी वैतागले असून शाखाधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी,असे निवेदनात म्हटले आहे.भिमाशंकर बिरादार,नागनाथ शिळीन,सिध्दगोंडा बिराजदार,राजकुमार बिराजदार,विठ्ठल कुंभार आदीच्या सह्या आहेत.
संख‌ येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या शाखाधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करावी,या मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.