जत,संकेत टाइम्स : जत येथे रासप कार्यकर्ता बैठक व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमा प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष द्यानेश्वर सलगर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे जत तालुका कोषाध्यक्ष प्रा.बंडू डोबाळे व त्याच्या असंख्य सहकाऱ्यांनी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला.जत येथील तालुका बैठक व पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमा प्रसंगी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष द्यानेश्वर सलगर, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजितराव पाटील, पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याक अध्यक्ष शाहिद मुलाणी, सोलापूरचे जिल्ह्याचे नेते आबासाहेब मोटे, सांगली जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब थोरात, माजी जिल्हाध्यक्ष मारुती सरगर, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष अकिल नगारजी, सोलापूर युवक जिल्हाध्यक्ष माऊली सरक यांची प्रमुख उपस्थिती मध्ये भाजपचे हिवरे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद कचरे, बंडु चौगुले, सागर माने, सोसायटी सदस्य संतोष माने, बाजचे युवक नेते विकास फोंडे, अंकलेचे अतुल पिंगळे, हिवरेचे अजित भंडे, दशरथ डोंबाळे, प्रथ्वीराज डोंबाळे, आप्पासाहेब बंडगर, गणेश कचरे, समाधान कचरे, पोपट कचरे, विश्वास सोलंकर, नाना सोलंकर यांच्या सहित असंख्य कार्यकर्त्यानी राष्ट्रीय समाज पक्षात जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी हिवरेचे प्रा.बंडू डोबाळे यांची जत तालुका अध्यक्ष पदी, वळसंगचे विठ्ठल पुजारी यांची सांगली जिल्हा उपाध्यक्ष पदी, कोसारीचे किसन टेंगले यांची सांगली जिल्हा सरचिटणीस पदी, निगडी बुद्रुकचे पांडुरंग धडस यांची जत तालुका युवक अध्यक्ष पदी, संखचे रमेश कोळी यांची जत तालुका युवक उपाध्यक्ष पदी व बालगांवचे शिवानंद माने यांची जत तालुका युवक संघटक पदी निवडी करण्यात आल्या.
सलगर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्र मध्ये रासपच्या १००० शाखा डिसेंबर अखेर उभा करण्याचा संकल्प केला असून त्यामध्ये जत तालुका आग्रेसर राहील यात शंका नाही. भविष्यातील सर्व निवडणूका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत त्यांची सुरवात आता पासूनच गाफील न राहता करा असे आव्हान केले. पाटील म्हणाले, जत तालुक्यामधून रासपचा पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्यच काय तर आमदार ही निवडून आणायचा आहे त्यासाठी सर्वजण एकसंघ होऊन कामाला लागू असे आव्हान केले. नूतन जत तालुका अध्यक्ष प्रा.बंडू डोबाळे यांनी जत तालुका रासपमय करून दाखवू तालुक्यामध्ये जानकर साहेबाना मानणारा वर्ग मोठा असून त्या सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात तालुक्यात गांवा गावात शाखा निर्माण करू असे आव्हान केले. शाहिदभाई मुलाणी, आप्पासाहेब थोरात, मारुती सरगर, अकिल नगारजी, किसन टेंगले, भूषण काळगी, संभाजी टेंगले, विश्वास निळे, बंडू चौगुले, लक्ष्मण पुजारी आदींनी मनोगत व्यक्त केले.यावेळी रासप नेते रामचंद्र मदने, बसवंत हिरवे, ओकार बंडगर, मधूकर काळे, अमोल कुलाळ, विकास म्हारनूर उपस्थित होते.