जत,संकेत टाइम्स : देशव्यापी संपामध्ये जत तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक यांनी जत पंचायत समिती समोर स्थानिक पातळीवरील प्रश्नाबाबत जोरदार निदर्शने केली.लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियनच्या वतीने
मागण्याचे निवेदन गटविकास अधिकारी यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे कि,आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानात शहर व ग्रामीण आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या आशा व गटप्रवर्तक या कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करत आहेत.पण त्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे,याकडे केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही म्हणून आज देशभर आशा व गटप्रवर्तक या आपल्या मागण्या घेऊन हे आंदोलन करत आहोत.आंदोलनाला जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी पाठिंबा दिला.
यावेळी युनियनच्या जिल्हाध्यक्षा कॉ.मिना कोळी,जिल्हा उपाध्यक्ष अंजूम नदाफ,कॉ.हणमंत कोळी, हेमा इमन्नावर,वैशाली पवार,आशा शिंदे, संगिता माळी, गिता बाबर,मालन व्हनकंडे,सरिता पवार आदी उपस्थित होत्या.