दुचाकीच्या डिकीतील ५० हजार चोरले | आठवड्यात दुसरी घटना ; जत शहरातील प्रमुख रस्ते,चौक असुरक्षित

0
जत,संकेत टाइम्स : जत पोलीसांना चोरट्याचे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र मधील काढलेले पैसे चोरीची आठवड्यातील दुसरी घटना घडली आहे.
जत शहरात चोरट्यानी डोके वर काढले असून बँक ऑफ महाराष्ट्र समोर हे चोरटे पैसे काढणाऱ्या नागरिकांची हेरून पैसे चोरी करत आहेत.जत पोलीसांची ढिलाईने शहर दिवसेन् दिवस असुरक्षित बनत आहेत.
शुक्रवारी सकाळी एक वाजता या आठवड्यातील दुसरी घटना घडली आहे. शहरातील विठोबा आप्पा साळे हे उमराणी रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतून ५० हजार रूपये काढून दुचाकी (एमएच ९,एएम ४५१५)मध्ये डिकी ठेवून ते स्टेट बँकेसमोरील भाजीपाला मार्केट भाजीपाला खरेदी करत असताना त्यांचा पाटलाग करत असलेल्या चोरट्यांनी डिकी तोडून त्यातील ५० हजार रूपये लांबविले आहेत.शहरातील भरगच्च चौकात ही चोरीची दुसरी घटना असून सोमवारी सिध्दनाथ (ता.जत) येथील शेतकरी संभाजी लकाप्पा चौगुले यांनी बँक ऑफ महाराष्ट्र मधून काढलेले तीन लाख सत्तर हजार रूपये ठेवलीली प्लास्टिक पिशवी चारचाकी गाडीतून पळवून नेहल्याची घटना घडली होती.
Rate Card
घटनेतील चोरटे सीसीटिव्हीत कैद झाले असतानाही गेल्या सहा दिवसात पोलीस चोरट्यांना पकडू शकलेले नाहीत. तोपर्यत शुक्रवारी घडलेली दुसरी घटना जत पोलीसांना आवाहन देत आहे.जत शहरातील उमराणी रोड व भाजीपाला मार्केट मधून भरदिवसा अशा घटना पोलीसांचे नियंत्रण सुटल्याचे स्पष्ट करत आहेत.शहरात अनेकवेळा चोऱ्या होऊनही पोलीस अंग झटकून काम करत नसल्याने चोरटे आणखीन बळकट झाले असून प्रत्येक एक दोन दिवसानंतर अशा घटना घडवून आणत आहेत.यात सामान्य नागरिकांचे कधीही न भरून येणारे नुकसान होत आहे.शहरात दररोज अनेकांचे किंमती मोबाइल चोरीच्या घटना घडत आहेत.मात्र आजपर्यत एकाही मोबाइलचा तपास लागलेला नाही हे विशेष आहे.
शहरातील बँकासमोर पोलीस नेमा
जत शहरात बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया,आयसीआयसी,एचडीएफसी अशा मोठ्या बँक आहेत.येथे मोठ्या प्रमाणात नागरिक पैसे काढण्यासाठी येत असतात.चोरटे दिवसभर बँकेत फिरून पैसे काढलेल्या खातेदारांचा पाटलाग करतात.थोडाजरी हलगर्जी पणा झाला तर पैसे चोरी होत आहेत.त्यामुळे या बँकांचा परिसरात पोलीसांची नेमणूक करावी अशी मागणी होत आहे.[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.