जत,संकेत टाइम्स : जत उत्तर भागातील शेगाव,वाळेखिंडी,बागलवाडी,कासलिं गवाडी,सिंगनहळ्ळी या गावाकडेच्या कोरडा नदी व ओढापात्रातून दररोज १५ डंम्परने वाळू तस्करी होत आहे.विशेष म्हणजे या भागात कामगिरीवर असलेले मंडल अधिकारी,तलाठी मँनेज असून त्यांना एका डंम्परमागे पाच हजार रूपयाचा हप्ता दिला जात असल्याची चर्चा आहे. हे गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे सुरू आहे.जतला नव्याने आलेले दमदार नवे तहसीलदार ही तस्करी रोकणार का, तस्करांना मँनेज असलेल्या तलाठ्याच्या मोहजाळ्यात अडकणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.
वाळू तस्करांची दुहेरी टिम ; या भागात तस्करीसाठी वाळू तस्कर दोन टप्यावर काम करत आहेत.लोकसेवेचे आव आणणारे काही गावचे संरपच,अनेक पक्षाचे पदाधिकारी व समाजसुधारक गावालगतच्या नदी व ओढा पात्रातून वाळू काढून ती जतसह आसपासच्या डंम्पर चालकांना विकतात.यात तस्करी ठिकाण ते जतपर्यत डंम्पर पास करून देण्याचे नियोजन त्यांच्याकडे असते.तर तेथून पुढे वाळू खाली करेपर्यत डंम्पर चालकांची जबाबदारी असते.भरणारे ७-१० हजार घेतात.पुढे डंम्पर चालक २४-२५ हजाराला विक्री करतात.यात महसूलचे हप्तेखोर वसूली कर्मचारी सामील असल्याने दररोज राजरोसपणे तस्करी सुरू आहे.
मंडल अधिकारी, तलाठी,कोतवाल मँनेज ; या परिसरातील गावातील महसूल यंत्रणा वाळू तस्करांच्या तुकड्यावर बाटिक झाली आहे.ते कारवाई करत नाहीतचं,शिवाय अधिकारी कारवाईसाठी बाहेर पडले तर इमानइतबारे तस्करांना टिप देण्याचे काम करतात.त्यामुळे तालुक्यातील अधिकाऱ्यांना या सुसाट वाळू तस्करीवर मोठी कारवाई करणे शक्य झालेले नाही.
तलाठ्याच्या वाढलेल्या मालमत्ता ; या गावात नेमणूकीस असणाऱ्या आपल्या विभागाशी गद्दारी करणाऱ्या तलाठ्याच्या वाढलेल्या मालमत्ता त्यांच्या वाळू तस्करीतील मिळकती स्पष्ट करत आहेत. मात्र तालुक्यात आलेल्या एकाही अधिकाऱ्यांनी अशा तलाठ्याविरोधात कारवाई करण्याचे धाडस दाखविलेले नाही.नव्याने आलेले तहसीलदार हे धाडस करतात का ? हे येणारा काळ ठरविणार आहे.