सरदार पाटील यांचा आज कॉग्रेसमध्ये प्रवेश | भाजपा जिल्हाध्यक्षांनी माझा घात केला ; सरदार पाटील

0
जत,संकेत टाइम्स : मी गेल्या दहा वर्षापासून भाजपमध्ये माजी आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रामाणिक काम केले,मात्र भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी माझा घात केला.मला जिल्हा परिषदेतील सभापती पद मिळू दिले नाही,असा थेट आरोप करत मी आज‌ कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील यांनी दिली.
संख ता.जत येथे आज होणाऱ्या कॉग्रेसच्या शेतकरी मेळाव्यात सरदार पाटील यांच्यासह अनेकजण कॉग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या मेळाव्याला कर्नाटकचे कॉग्रेस नेते तथा माजी गृहमंत्री एम.बी.पाटील,गृहराज्य मंत्री सतेज पाटील,सहकार,कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम,आमदार मोहनशेठ कदम,आमदार विक्रमसिंह सावंत,आमदार आंनद‌ न्यामगौडा,कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील,शहर अध्यक्ष पृथ्वीराज पाटील,श्रीमती जयश्री पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
सरदार पाटील म्हणाले,माझे गाव आंसगीत काहीतरी बदल करावा म्हणून सैन्य दलातील निवृत्त झाल्यानंतर मी राजकारणात प्रवेश केला.विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले.आमचा मतदार संघ बदल्यानंतर दरिबडची या मतदार संघातून जिल्हा परिषद निवडणूक लढवून विजयी झालो.भाजपाला जिल्हा परिषदेत सत्ता मिळाली त्यावेळी जत तालुक्यातील सदस्य संख्या जादा असल्याने तालुक्याला मोठे पद अपेक्षित होते.त्यावेळी माझे नाव चर्चेत होते.भाजपाच्या नेत्यांनी कॉग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य झालेले विक्रमसिंह सांवत यांना जतच्या कोणत्या सदस्याला पद द्यायला पाहिजे असे विचारले होते.
त्यांनी माझे काम बघून मला पद देणे चांगले होईल‌,असे त्या नेत्याला सांगितले होते.यांचा संशय‌ मनात धरून जिल्ह्यातील भाजपा नेत्यांनी मला डावलले.पहिल्या टर्ममध्ये सभापती पदासाठी नगरपरिषद निवडणूक असल्याने तुम्ही थांबा पुढील दिड वर्षासाठी संधी मिळेल म्हणून माजी आमदार विलासराव जगताप यांनी सांगितले होते.त्यांनतर सव्वा वर्षाचा कार्यकाल संपला,त्यानंतर अडीच वर्षानंतर सभापती बदलले त्यावेळीही मला जाणिवपुर्वक डावलले.
Rate Card
मी जिल्ह्यातील भाजपा नेत्यांपुढे नाक घासत नव्हतो,त्यावेळी आमचे विलासराव जगताप हेच नेते होते.त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांना त्यांचे कायम वाईट वाटायचे त्यांचा फटका मला बसला.त्यांनी मला डावलले.मला राजकीय वारसा नसल्याने पद मिळाले नाही.
आमदार विक्रमसिंह सांवत हे कर्तृव्यदक्ष व तरूण नेते आहेत.जतच्या विकास करण्याची त्यांना तळमळ आहे.तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी ते काम करताना मी बघितले आहे.जतच्या प्रंलबित प्रश्नासाठी त्यांना तालुक्यातील नागरिकांनी साथ देण्याची गरज आहे.
मी यापुढे आमदार विक्रमसिंह सांवत यांच्या नेतृत्वाखाली कॉग्रेसमध्ये काम करणार आहे.त्यांनी मला संधी दिली तर बनाळी,जाड्डरबोबलाद, मुचंडी यापैंकी कोणत्याही‌ जिल्हा परिषद मतदार संघातून निवडणूक लढविण्यास मी तयार आहे,असेही शेवटी पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.