जत,संकेत टाइम्स : जत तहसीलदारांचे चेंम्बर सत्कार सोहळ्याचे व्यासपीठ बसल्याचे चित्र असून गेल्या चार दिवसात नवे तहसीलदार सत्कार स्विकारण्यात जादाकाळ व्यस्त राहत असल्याने कामासाठी आलेल्या नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
या सत्कार सोहळ्याचा मंगळवारी वकीलांनाही फटका बसला.मंगळवारी दोन महिन्यापासून रखडलेल्या जमिनीसह विविध केसेसच्या तारखा ठेवण्यात आल्या होत्या.मात्र तहसीलदार बराच वेळ बैठकीत असल्याने वकीलांनी संताप व्यक्त केला.
संतप्त वकील संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी जोंगेद्र कटारे यांच्या कार्यालयात मोर्चा वळविला मात्र कटारेही बैठकीत असल्याचे सांगण्यात आल्याने वकील संघटनेच्या वतीने प्रशासनाचा निषेध व्यक्त करत,जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष
अँड.रणधीर कदम यांनी सांगितले.
यामुळे लांबवरून आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे माघारी फिरण्याची वेळ आली.यावेळी वकील संघटनेचे अध्यक्ष अँड. कदम,अँड.अशोक निटवे,अँड.प्रकाश नाईक,अँड.साजिद सौदागर,अँड.पांडुरंग मोरे,अँड.नाना गडदे,अँड.सागर व्हनमाने,अँड.इरशाद खतीब,अँड.सोहेल शेख आदी वकील उपस्थित होते.
तहसीलदारांच्या टेबलवर जाऊन सत्कार
जतला नवीन आलेले तहसीलदार यांचे अनेक नेते,संघटना,समाज सुधारकाकडून जंगी स्वागत करण्यात येत आहे.यात नव्या तहसीलदारांना ज्ञात नसलेले वाळू तस्कर,कार्यालयातील दलालाकडून सत्कार केले जात आहेत.
विशेष म्हणजे असे सत्कार करणारे थेट तहसीलदारांच्या चेंम्बरमधील आसनवर जाऊन सत्कार करतात,एकीकडे तहसीलदार निवेदन देणाऱ्या नागरिकांना खालून निवेदन द्या म्हणून सांगतात,तर दुसरीकडे सत्कार करणाऱ्यांना आसनापर्यत प्रवेश कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान तहसीलदार हे एक न्यायाधीश आहेत,यांचे भान ठेवण्याचेही गरज आहे.
जत वकील संघटनेच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन जाब विचारण्यात आला.दरम्यान सत्कार सोहळे सुरू असल्याने नागरिकांना चेंम्बर बाहेर ताटकळत उभे रहावे लागत आहे.