जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव ओसरला,चार दिवसात ३३ नवे रुग्ण

0
जत संकेत टाइम्स : जत तालुक्यात गेल्या चार दिवसात कोरोनाचा प्रभाव मोठा प्रमाणात खालावला आहेत.गेल्या चार दिवसात ३३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही दररोजची संख्या ५-७ च्या आसपास आहे.तर ५४ जण कोरोनामुक्त झाल्याने चिंता कमी झाली आहे.
गणेशोत्सव, शाळा,व संपुर्ण बाजार पेठ खुली झाल्यानंतर कोरोनाचा प्रभाव वाढेल असा कयास लावली जात होती.मात्र नागरिकांनी घेतलेली खबरदारी यामुळे कोरोना रोकण्यात यश आले आहे.
दरम्यान तालुक्यात आतापर्यत १३,९६६ रुग्णाची नोंद झाली आहे तर,१३,५१३ कोरोना मुक्त झाले आहेत.आतापर्यत ३१२ रुग्णाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे. सध्या १४१ रुग्ण सध्या उपचाराखाली आहेत.
एकीकडे आरोग्य विभागाकडून वाढविलेला लसीकरणाचा टक्का बाधित रुग्णाची संख्या रोकण्यात मदत झाली आहे.

 

 

 

 

 

 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.