हप्तेखोरीला सोकावलेल्या शुक्राचार्यांच्यामुळे तालुकाभर मटका,जुगार अड्डे बळावले

0

जत : जत तालुक्यात अवैध धंद्याने सर्व सिमा ओलांडल्या आहेत.मटका,जुगार,दारू,सिंदी,तस्करी,गुन्हेगारीने कायदा सुव्यस्थेचा प्रश्न कधी गंभीर बनला आहे.विधानसभेच्या निवडणूका तोंडावर आल्या असतानाही जत विभागातील पोलीसाच्या कारवाया थंडच आहेत.ना कोणता डिप्लोमा, ना ढीगभर भांडवल… राजकीय आश्रय अन् हप्तेखोरीला सोकावलेल्या शुक्राचार्यांशी ‘दोस्ताना’ झाला की बस्स… झटपट कमाईचा मार्ग मोकळा… काळेधंदे, तस्करी उलाढाली, सावकारीतून मालामाल झालेल्या माफियांसाठी जत तालुक्यातील दुष्काळी गावे तस्करी उलाढालीतील मुबलक कमाईचे अड्डे बनत आहेत.

 

 

ना कायद्याचा धाक.. ना प्रशासनाचा अंकुश राहिल्याने अवैध धंदे चालकांच्या टोळ्यातील साथीदार काळाच्या ओघात मोकाट बनू लागले आहेत. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर तस्करी टोळ्या, काळेधंदेवाले, समाजकंटकाविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू झाली नसल्याने सर्वकाही मोकाट सुरु आहे.तालुकाभर दिवसेन् दिवस काळ्या धंद्यांचे साम्राज्य चव्हाट्यावर येऊ लागले आहे. स्थानिक पातळीवर ‘मिलीभगत’द्वारे चाललेला बाजार उघड होऊ लागला आहे.

 

Rate Card
नाकावर टिच्चून सुरू असलेले मटका, जुगारी अड्डे कधी उद्ध्वस्त होणार असा प्रश्न विचारला जात आहे.गुन्हेगारांच्या फैलावामुळेच इथं काळ्याधंद्याचे साम्राज्य वाढू लागल्याचं चित्र दिसू लागले आहे.मटका,तीनपानी जुगारी अड्ड्यांचे प्रस्थ बेधडक वाढले आहे. देशी, विदेशी दारूचा महापूर वाहत असतानाही स्थानिक यंत्रणेला तस्करांच्या हालचाली दिसून येत नाहीत. यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे गावांना काळेधंदेवाल्यांसह तस्करी टोळ्यांचा विळखा पडू लागला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.