जत,संकेत टाइम्स : जत शहरात सव्वा महिन्यापुर्वी पडलेल्या दरोड्यातील तिघा दरोडे खोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले असून यातील संशयित फिर्यादीचे पती विजय जाधव यांचे मित्रच असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.कृष्णा प्रकाश सुर्यवंशी,(वय २५ वर्षे,रा.बिटलेवाडी ता.खटाव जि.सातारा)
अनुराग राजेश्वर सिंग,(वय २२ वर्षे, रा.बोपखेल गावठाण, विश्रांतवाडी पुणे मुळ रा.नेदुला चौराहा,खालीदाबाद उ.प्रदेश),सोन्या उर्फ खंडेश्वर शिवाजी तांबे, (वय १९ वर्षे, रा.बोपखेल गणेशनगर कॉलनी नं.४,विश्रांतवाडी पुणे) यांना ताब्यात घेतले आहे.तर अन्य तिघांचा शोध सुरू आहे.
अधिक माहिती अशी, जत शहरातील मध्यवर्ती असणाऱ्या शिवानुभव मठा नजिक राहणाऱ्या सरिता विजय जाधव यांच्या घरात २१ ऑगष्ट २०२१ रोजी मध्यरात्री त्यांच्या घराची बेल संशयित सहा जणांनी वाजविली.त्यांनी आतून आवाज देताच आम्ही आण्णाचे मित्र असल्याचे सांगितल्यानंतर दरवाज्या उघडताच सहा जणांनी ज़बरदस्तीने घरात प्रवेश केला.आतमध्ये येताच धारदार शस्ञाचा धाक दाखवत घरातील कपाटामधील ५ लाख ५२ हजाराचे सोन्याचे दागिणे व रोख ७० हजार असा ५ लाख २२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेहला होता.याप्रकरणी जत पोलीसात दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून तपास सुरू होता.फिर्यादीचा पती विजय जाधव हा जत पोलीस ठाणे कडील खुनाचा प्रयत्नच्या गुन्ह्यात सांगली जेल मध्ये असून सदरचा गुन्हा फिर्यादीच्या पती विजय जाधव याचे ओळखीच्या कोणीतरी केला असल्याचे संशय होता,
त्या दरम्यान भारत सुतगिरणी ते अहिल्यानगर,माधवनगरकडे जाणारे रोडवरील यशवंतनगर बसस्टॉप चौकात ३ तरुण त्याचे सिल्वर रंगाचे स्लेंडर व काळया रंगाचे होंडा शाईन अशा दोन मोटार सायकलीसह थांबले अशी खात्रीशीर माहिती मिळाली,मिळाले माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील अधिकारी कर्मचारी असे भारत सुतगिरणी ते अहिल्यानगरकडे जाणारे रोडने यशवंतनगर बसस्टॉप अलीकडे थांबून वरील माहिती प्रमाणे संशयीत इसम मिळतात का याची पाहणी केली असता, तीन इसम वेगवेगळया गाडीवर बसुन काहितरी बोलत बसले असल्याचे समजले, त्याच्यावर संशय आल्याने त्या तिघांना वाहनासह ताब्यात घेऊन त्याना पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी त्यांना नाव,गाव विचारता त्याने आपले कृष्णा प्रकाश सुर्यवंशी,अनुराग राजेश्वर सिंग,सोन्या उर्फ खंडेश्वर शिवाजी तांबे असे सागितले.त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता कृष्णा सुर्यवंशी याचे कमरेला लोखंडी सुरा व पिवळया धातूचे एक मणी मंगळसुत्र, हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, तसेच अनुराग सिंग याचे कमरेला लोखंडी सुरा व एक होंडा शाईन मोटारसायकल, तसेच प्रत्येकाकडील तीन वेगवेगळे कंपनीचे मोबाईल मिळाले
तो सविस्तर पंचनाम्याने पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे यांनी पुढील तपासकामी मंगळसुत्र, दोन सुरे, दोन मोबाईल आणि दोन मोटार सायकली असा एकूण १,५४,२००/- रु.किं.चा मुद्देमाल तो सविस्तर पंचनाम्याने जप्त केला, त्या तिघांना त्यांचेकडे मिळाले मंगळसुत्र,गाडयांचे मालकीबाबत व घातक शस्ञे जवळ बाळगणेबाबत वारंवार चौकशी करता ते समाधानकारक माहिती सांगत नव्हते.त्यावेळी पोउनि दिलीप ढेरे व अमलदार यांनी विश्वासात घेवून चौकशी केली असता,त्यानी सुमारे एक सव्वा महिन्यापूर्वी साधारण रक्षाबंधनचे एक दिवस अगोदर आम्ही सर्वजन कृष्णा सुर्यवंशी याचे हॉटेल आठवण ढाबावर सगळे एकत्रीत जमा झालो होतो.
त्यावेळी प्रत्येकाचे काही ना काही अडचण सांगत असताना आपण कोठेतरी मोठा हात मारुया असे म्हणत चर्चा करीत असतानाच कृष्णा याने सांगितले माझा जत येथील मित्र विजय जाधव हा सध्या खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहे. त्याने मला एकदा सांगितले की होते, माझे घरी लाखो रुपये व भरपूर सोने आहे. ते आपण सर्वानी मिळुन आपण लुटुया असे ठरविले, त्यावेळी आम्ही तिघे माझे बाकीचे साथीदार असे टु व्हीलर मोटार सायकल, फोर व्हीलर हुंदाई आय २० कार या गाड्यांनी सांगली येथे आलो तसेच कवठेमहकाळ येथील मित्र याचे घरी सर्वानी जेवण करुन टु व्हीलर व फोर व्हीलर वाहनाने जतमध्ये गेलो, माझा मित्र विजय जाधव याचे घर माझे साथीदार यांना दाखविले.
या ठिकाणी दरोडा टाकुन त्या घरातील सोने व पैसे घेऊन जाण्याचे आहे, असे सागितले त्याप्रमाणे मी मित्र विजय जाधव याचे घराचे बेल वाजबली असता आतून आवाज येताच आण्णांचा मित्र आहे असे सांगितले,त्यामुळे आतील महिलेने दरवाजा उघडताच आम्ही सर्वांनी घरात प्रवेश करुन आमचे कडील सुरा महिलेच्या गळयाला लावून तिला आतमध्ये नेले व त्या
दोन महीलेच्या गळयांना सुरे लावून भिती दाखवत जिवे मारणेची धमकी देत त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिणे व त्याचे घरातील लोखंडी कपाट तोडून आतील रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन आम्ही आमचे टु व्हीलर व फोर व्हीलर वाहनाने तेथुन निघुन गेलो व पुढे गेल्यावर सोने आणि रोख रक्कम सर्वानी वाटून घेतली असल्याचे संशयितांनी पोलीसांना सांगितले आहे.त्यावेळी त्या तिघांना ताबेत घेऊन त्यांना पुढील तपासकामी रिपोर्टने जत पोलीस ठाणे कडे आरोपी मुद्देमाल वर्ग करण्यात आले,उर्वरीत त्याच्या साथीदार यांचा शोध सुरु आहे.
जत दरोड्यातील संशयित दरोडेखोर,मुद्देमाल व पोलीस पथक