वाळू तस्करी रोकण्यासाठी लिलाव प्रक्रिया राबवा | संजय कांबळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील बोरनदीसह शासकीय  ओढापात्रातील वाळूची तस्करी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यानी शासकिय ओढापात्रातील वाळूची लिलाव प्रक्रिया राबवावी,अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

 

त्यानी निवेदनात म्हटले आहे की, जत तालुक्यातील जत पूर्व भागातील बोर नदीसह अन्य ठिकाणी ओढापात्रात मोठ्या प्रमाणात वाळूचे साठे आहेत. जत तालुक्यातील शासकिय ओढापात्रातील वाळूची निलाव प्रक्रिया बंद असल्याने या तालुक्यातील वाळू माफीया हे चोरून शासकीय ओढापात्रातील वाळूची तस्करी करत आहेत.या वाळू तस्करीमध्ये राजकिय पक्षाचे नेतेमंडळी, पक्षाचे कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते यांचे हितसंबंध असल्यामुळे तालुक्यातील शासकिय ओढापात्रे ही वाळू माफियांची पैसे कमावण्याची केंद्र बिंदू झाली आहेत.
जत शहरासह,तालुक्यात मोठ्या प्रमाणात शासकिय तसेच नवनविन खासगी बांधकामे सुरू आहेत अशा बांधकामांना मोठ्या प्रमाणात वाळू व मुरूम वापरण्यात येत आहे. जत तालुक्यातील कोणत्याही शासकिय ओढापात्रातील वाळूची निलाव प्रक्रिया सुरू नसताना जत शहरासह तालुक्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधकामांना वाळूचा पुरवठा कोणत्या प्रकारे सुरू आहे हे प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
वाळू माफियांकडून तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीरपणे वाळू तस्करी सुरू असून वाळू तस्करीमुळे तालुक्यातील शासकिय ओढापात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यात पाणी साचून अनेक दुर्घटना घडत आहेत.जत तालुक्यातील वाळू तस्करांना तालुका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभय असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी सुरू आहे.
या बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या वाळू तस्करी व मुरूम उत्खननामुळे शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसुल बुडत असून वाळू तस्कर, प्रशासनातील वाळू तस्करी दंडात्मक भरारी पथकातील अधिकारी व कर्मचारी दिवसेंदिवस मालामाल होत असून सर्व सामान्य नागरिकांना मात्र हजारो रूपये मोजून चोरट्या मार्गाने वाळू विकत घ्यावी लागत आहे. जिल्हा प्रशासनाने जत तालुक्यातील बोरनदीसह शासकीय ओढापात्रातील  सर्वच वाळूची निलाव प्रक्रिया राबविल्यास वाळू माफियांना वचक बसेल व निलाव प्रक्रियामुळे शासनाला मोठ्या प्रमाणात महसुल मिळेल. त्यामुळे जिल्हाधिकारी श्री अभिजित चौधरी यानी जत तालुक्यातील शासकिय ओढापात्रातील वाळूची निलाव प्रक्रिया राबवावी, अशी मागणी ही कांबळे यांसंजयरहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.