जत,संकेत टाइम्स : जत येथे ओबीसीच्या सर्व कार्यकर्त्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त अभियंता शिवाजीराव शेंडगे उपस्थित होते.यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना समाजाच्या विविध पुढील योजनाची माहिती देण्यात आली.पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.
शेंडगे म्हणाले,राज्यातील अनेक राजकीय पक्ष ओबीसीला समाजाला आपल्या फायद्यासाठी वापर करून घेत आहेत.त्यामुळे ओबीसी जनतेने राजकीय भूलथापांना बळी न पडता आपल्या न्याय हक्कासाठी लढावे,तालुक्यामध्ये ओबीसी चळवळ वाढवणे काळाची गरज आहे,ओबीसी आरक्षणासाठी लढा उभारणे अत्यंत आवश्यक आहे,असेही शेंडगे म्हणाले.
प्राध्यापक दुधाळ सर म्हणाले,ओबीसी समाजाने एकत्रित येऊन आपल्या हक्कासाठी लढा उभा करावा.दिनकर पतंगे म्हणाले, तालुक्यात ओबीसी चळवळ मोठ्या गतीने सुरू आहे.ती मोठ्या ताकतीने पुढे न्यायची आहे,आपल्या हक्कासाठी गरज भासल्यास रस्त्यावर उतरावे लागणार आहे.तुकाराम माळी,श्री.पुजारी सर,श्री.पांढरे सर,श्री.बंडगर सर,राजेंद्र आरळी व कार्यकर्ते उपस्थित होते.