कोर्टाची देखील दिशाभूल, सांगली पोलीस खात्याचा प्रताप, सांगली पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह, राज्यात चर्चा
सांगली : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीवाक्य केवळ नावापुरते राहिले आहे याची प्रचिती सांगली जिल्ह्याच्या पोलिसांच्या कामगिरी वरून दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील अगळगाव येथील रहवासी मंगल कांबळे हिचे राहते घर जीसेबीच्या साहाय्याने उध्वस्त केल्या प्रकरणी आरोपी विजय माळी, शोभा माळी सह इतर अनोळखी लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपी विजय माळी याचा अटक पूर्व जामीन फेटाळून लावला. तसेच आरोपीने न्यायालयात हमीपत्र सादर केले की तो तपास कमी सहकार्य करेल, पिडितांवर दबाव आणणार नाही. न्यायलयाने त्याला जिल्हा न सोडण्याबाबत व पोलीस ठाण्यास हजेरी लावण्याची सक्ती आदेशाने केली.
परंतु या कोर्टाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत चक्क आरोपी विजय माळी हा पोलिसांच्या हातात तुरी देऊन फरारी झाल्याचे चित्र आहे. आरोपी आम्हाला सापडत नाही आम्ही त्याच्या मागे विशेष पथक नेमले आहे शोधण्यासाठी असे उपविभागीय पोलिस अधिकारी रत्नाकर नवले, कवठे महांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शाहणें हे तोंडी सांगत आहेत. पीडत कुटुंब जिल्हाधिकारी कार्यालय समोर गेले चार दिवसांपासून बेमुदत आंदोलनाला बसले आहे. आंदोलन स्थळी ना ही जिल्हाधिकारी आले अथवा जिल्हा पोलीस प्रमुख भेटण्यास आले. याउलट आंदोलन कसे चिरडले जाईल याचा प्रयत्न सुरू आहेत. आमदार खासदार या ठिकाणी येऊन पीडितांची आजही चौकशी केलेली नाही.
पीडित महिला व त्यांच्या कुटुंबास पाणी, जेवण आणून दिले जात नाही, कपडे, अंघोळ, शौचल्यास जाण्यास अथवा गावाकडे काही काम असल्यास तिथे जाण्यास मज्जाव केलं जातं आहे. ही सर्व घडतंय सांगली जिल्हाधिकारी कार्यालय समोर. या मानव अधिकार हनन साठी जबाबदार कोण ? पोलिसांची दंडेलशाही सुरू आहे याचा निषेध मंगल कांबळे, वर्षा कांबळे, नामदेव कांबळे यांनी केला. प्रसंगी अन्न त्याग करणार असल्याचे मंगल कांबळे म्हणाले.