माजी सैनिकाने केला हवेत गोळीबार | जत तालुक्यातील प्रकार | पोलीसानी घेतले ताब्यात
उमदी : कुणीकोणूर ता.जत येथील माजी सैनिकांनी आपल्या परवाना धारक पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याप्रकरणी उमदी पोलीसानी गुन्हा दाखल केला आहे.गंगाराम जयराम चव्हाण(लमाण)रा.कुणीकोणूर असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सैनिकाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, गंगाराम चव्हाण हे माजी सैनिक आहेत.ते लमाणतांडा येथील सेवालाल मंदिरासमोर राहतात.गुरूवारी त्यांनी संध्याकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान अज्ञात कारणानी घरासमोर येत आपल्या परवाना धारक पिस्तूलमधून तीन फेरा हवेत झाडल्या.यावेळी या गोळ्याच्या तीन पुगळ्या मैदानात पडल्या आहेत.दरम्यान याप्रकरणी उमदी पोलीसांनी शस्ञ अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सा.पो.नि.पंकज पवार करत आहेत.
