बेंगलोर बघण्यासाठी गेलेल्या चालकावर नियतीचा घाला | एकजण जागीच ठार,दोघे गंभीर

0
जत,संकेत टाइम्स : गुहाघर- विजापूर राष्ट्रीय महामार्गावर दोन मालवाहतूक ट्रकचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात ट्रक चालक जागीच ठार झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत.सिध्देश्वर मधुकर इंगवले (वय २२ रा.पाटकळ ता.मंगळवेढा)असे मयत चालकाचे नाव आहे,तर महिंद्र नवनाथ थोरात (वय २८,रा.मुगाव,पाटोदा,जि.बिड),तुषार टेकाळे,(वय २५,येवलवाडी ता.पटोदा,जि.बिड)अशी जखमीची नावे आहेत.घटना शनिवारी (ता.९) ला दुपारी दिडच्या सुमारास घडली.

Rate Card

अधिक माहिती अशी,जामखेड येथील युवराज राऊत यांच्या मालकीचा मालवाहतूक ट्रक (एमएम १६,एवाय् ९५९८) हा चालक सोहेल रशिद शेख,(महिंद्रवाडी,ता.पाटोदा जि.बिड)हा मालूर तामिळनाडू येथून अल्युमिनियम भरून  अहमदनगरकडे येत होता.तर दुसरा  मालवाहतूक १२ टायर ट्रक(एमएच १३,एक्स २७८६) चालक सिध्देश्वर मधुकर इंगवले(वय २२,रा.पाटकळ,ता.मंगळवेढा,जि.सांगली)हा जतकडून – विजापूरकडे मँगनेट भरून भरधाव वेगाने चालला होता.

 

 

 

मुरूनहट्टी फाटा,मुंचडी गावच्या हद्दीजवळ दोन्ही ट्रकची समोरासमोर भीषण धडक झाली.त्यात सिध्देश्वर इंगवले हा चालक जागीच ठार झाला,तर दुसऱ्या ट्रकमधील महिंद्र थोरात,व तुषार टेकाळे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.सुदैवाने चालक सोहेल शेख हा बचावला आहे.दोन्ही ट्रकचे व आतील मालाचे मोठे नुकसान झाले आहेत.जखमीवर मिरज शासकीय रुग्णालय उपचार सुरू आहेत.याप्रकरणी रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
भीषण अपघात
दोन्ही ट्रक भरधाव वेगाने येत असल्याने धडक झाल्यानंतर दोन्ही ट्रकच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे.त्यामुळे मयत चालक व जखमींना बाहेर काढताना पोलीसांना कसरत करावी लागली.
बेंगलोर बघण्यासाठी आलेल्या एकजण गंभीर
मुगाव,ता.पाटोदा,जि.बीड येथील मंहिद्र थोरात हा सोहेल शेख मित्र असलेल्या ट्रकमधून बेंगलोर बघण्यासाठी गेला होता.परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला असून त्यांच्या पोटात काहीतरी घुसल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.
विजापूर-गुहागर राष्ट्रीय महामार्गावर दोन ट्रकचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.