केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून जत तालुक्यातील चौसष्ट गावांचा पाणीप्रश्न सोडविणार ; माजी महापौर, विवेक कांबळे .

0
10

जत,संकेत टाइम्स : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मा. ना .रामदासजी आठवलेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पक्षाचे वतीने दुष्काळी जत तालुक्यातील शेतीला कृष्णेचे पाणी मिळावे यासाठी संघर्ष करित आहोत.

 

 

 

 

परंतु जत पूर्व भागातील चौसष्ट गावांना अद्याप पाणी मिळाले नाही. जतच्या पाणीप्रश्नासाठी येथिल एक साधूसंत तुकाराम महाराज संख ते मुंबई पायी दिंडी काढून मंत्रालयावर धडक मारतो तरीही सरकार त्याची दखल घेत नाही.

 

 

आता यापुढे आम्ही जतच्या पाणीप्रश्नासाठी तुकाराम महाराज यांच्या पाठीशी राहू त्यासाठी पुन्हा आंदोलन सुरू करू. जिल्हाधिकारी कार्यालयावर पाण्यासाठी मोर्चा काढू.जतच्या पाणीप्रश्नासाठी आम्ही १९८४ पासून संघर्ष सुरू ठेवला असून जत तालुक्यातील पुर्व भागातील शेतीला पाणी मिळाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. रिपब्लिकन पक्ष हा सर्व जाती धर्माचा पक्ष झाला आहे.

 

 

यावेळी बोलताना नगरसेवक जगन्नाथ ठोकळे म्हणाले, जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे यानी जिल्ह्यामधिल पक्ष वाढीसाठी चांगले काम केले आहे म्हणूनच पक्षाने त्यांची परत जिल्हाध्यक्ष म्हणून फेर निवड केली आहे. संजय कांबळे यांच्या पाठीशी रिपब्लिकन पार्टी ची पूर्ण ताकत आम्ही उभी करू.

 

 

 

यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष संजयरावजी कांबळे म्हणाले जिल्ह्याचे पालकमंत्री व जलसंपदामंत्री ना.जयंतरावजी पाटील साहेब यानी जत पूर्व भागातील चौसष्ट गावांना सहा टि.एम.सी. पाणी देतो म्हणून घोषणा केली आहे. परंतु हे सहा टि.एम.सी. पाणी ते कोणत्या प्रकारे देणार याचा जी.आर.त्यानी दाखवावा. जयंतरावजी पाटील यानी जत तालुक्यातील शेतक-यांची फसवणूक केली आहे. जतचा बावीसहजार सभासदांचा साखर कारखाना विकत घेऊन सभासदाना वा-यावर सोडले आहे. जयंतरावजी पाटील यानी हा कारखाना दुष्काळी भागातील सभासदांच्या नावावर करावा असे आवाहन ही कांबळे यांनी केले.

 

 

यावेळी बोलताना चिक्कलगी भूयार मठाचे मठाधिपती श्री. संत तुकाराम महाराज बाबा म्हणाले जत तालुक्यातील शेतीसाठी पाणी मिळावे ही आमची मागणी आहे. यासाठी आम्ही मंत्रालयावर धडक मारली पण आमच्या पदरात काही पडलं नाही. तरी तालुक्यातील सर्वच पक्षानी एकत्र येऊन जत तालुक्याचा पाणीप्रश्न मार्गी लावावा.

 

 

 

यावेळी चिक्कलगी भूयार मठाचे मठाधिपती श्री. तुकाराम महाराज यानी कोरोना कालावधीत चांगल्या प्रकारे काम केल्याबद्दल त्यांचा व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली जिल्हाध्यक्ष म्हणून संजयरावजी कांबळे यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट महाराष्ट्र प्रदेश सचिव विवेकरावजी कांबळे यांच्याहस्ते करण्यात आला.

 

 

यावेळी कवठेमहांकाळ चे नगरसेवक विशाल वाघमारे,जिल्हायुवक अध्यक्ष अशोक कांबळे, प्रा.हेमंत चौगुले,संदेश भंडारे, यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

 

 

 

याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सांगली महिला अध्यक्षा छायाताई सर्वदे, अरूण आठवले, अभिजीत आठवले, विकास साबळे, संतोष.वाघमारे, बापू सोनवने, प्रविण धेंडे, डाॅ.रविकुमार गवई,अशोक सांगलीकरसचिन जाधव,सुभाष कांबळे, विनोद कांबळे, किशोर चव्हाण, शंकर वाघमारे, नारायण वाघ,शंकर पडसलगीकर, रामकृष्ण गंजणे सोमनाथ कांबळे,आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत तालुकाअध्यक्ष संजय कांबळे (पाटील) यानी केले.आभार भूपेंद्र कांबळे यानी मानले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here