बनाळी : बनाळी ता.जत येथील संतोष आंनदा शिंदे यांच्या रेवनाळ रस्त्यावरील बंद घर फोडून चोरट्यांनी ४५ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.याप्रकरणी जत पोलीसात रात्री उशिरापर्यत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी,रेवनाळ-बनाळी रस्त्यावर संतोष शिंदे हे कुंटुबासह राहतात.बुधवार घराचे दरवाजे बंद करून सर्वजण बनाळी येथील ग्रामदैवत श्री बनशंकरी देवीच्या दर्शनासाठी गेले होते.

याचा फायदा घेत दुपारी साडेतीनच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील फुले,लहान मुलाच्या अंगठ्या असे अर्धा तोळे सोने,रोख ८ हजार रूपये असा ४५ हजार रूपयाचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.संतोष शिंदे घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला.त्यांनी पोलीसात धाव घेतली आहे.दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.