डफळापूर
संकेत टाइम्स वृत्तसेवा
जत तालुक्यातील सिंचन योजनेसह विविध प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जत तालुक्याचा दौरा करावा,अशी मागणी महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हा उपप्रमुख विठ्ठल कोळी यांनी केली आहे.
तालुक्यात सिंचन योजना,रस्ते,सामाजिक प्रश्न,शासकीय कार्यालयातील सुविधा,अनेक विभागातील रिक्त पदे,तालुका विभाजन,शासकीय कार्यालये आहेत,पण नागरिकांना लुटण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू आहेत.याला पायबंध घालण्यात तालुक्यातील राजकीय इच्छाशक्ती कमी पडत आहे.
शिवसेना जत तालुक्यातील दुष्काळ,पाणी टंचाई अशा जिव्हाळ्याचा प्रश्नावर सातत्याने धावून आली आहे.आताही तालुक्याला शिवसेनेची गरज आहे.आपण मुख्यमंत्री या नात्याने जत तालुक्याचा दौरा करावा,जेणेकरून आपणाला तालुक्यातील प्रश्न जाणता येतील.
दरम्यान मी शिवसेनाचा पदाधिकारी या नात्याने जोपर्यत आपण जत तालुक्यात येणार नाही,तोपर्यत चप्पल न घालण्याचा निर्णय घेतला आहे.जत तालुका सुजलाम,सुफलाम होईल या आशेने अनेक पिढ्या गेल्या आहेत.तालुक्याचा उध्दार करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे.
या दुर्लक्षीत तालुक्यातील समस्या सोडविण्यासाठी आपण एकवेळ जत तालुक्याचा दौरा करावा, असेही विठ्ठल कोळी यांनी पक्षाला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.