संकेत टाइम्स वृत्तसेवा
कै.लिंगय्या शिवय्या जंगम (सर) व कै.उमेश रावसाहेब बिराजदार यांच्या समरणार्थ श्री.हुडेदलक्ष्मी नवरात्र महोत्सव मंडळ,संख यांचे वतीने आयोजित भव्य कब्बडी स्पर्धेचे उद्घाटन माजी सभापती प्रकाश जमदाडे यांचे हस्ते संपन्न झाले.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बसवराज पाटील होते.
स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ.प तुकाराम महाराज,डॉ.भाऊसाहेब पवार,राजे विजयसिंह डफळे दुय्यम आवारचे सभापती देवगोंडा बिराजदार,माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव टोणे,युवक नेते सुभाष पाटील,फुटाणे सर,कंनुरे सर उपस्थित होते.
प्रकाश जमदाडे म्हणाले,आपल्या भारत देशात कित्येक खेळांचा उगम झाला आहे.या खेळांच्या जन्म घेण्यामागे आणखीन बरीच कारणं असतील नसतील पण एक महत्वाचं कारण असेल आणि ते म्हणजे शारिरीक व्यायाम, शरीराची हालचाल होणं आवश्यक आहे आणि ते या मैदानी खेळांच्या माध्यमातुन होत असल्यामुळे या खेळांना फार महत्वं असायचं.
जमदाडे म्हणाले,धावतं युग आलं आणि मैदानं ओस पडतांना दिसू लागली. युवा पिढी हातात मोबाईल घेऊन तासन् तास घरात एकाच ठिकाणी बसू लागली याचे दुष्परीणाम सुध्दा लगेच दिसायला लागले असून मेंदू दगड झाला आणि शरीर अस्ताव्यस्त वाढत गेलं.यादुष्परीणामां पासून युवा पिढीला दुर ठेवायचे असेल तर त्यांना मैदानी खेळांचं महत्वं कळायलाच हवं.
जमदाडे पुढे म्हणाले,आपल्या भारतातील असाच एक पुर्वीपासुन चालत आलेला खेळ म्हणजे कबड्डी, या खेळाला चालना देण्याची गरज आहे. एक विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे कबड्डी हा एकमेव असा खेळ आहे की या खेळात पुरूष आणि महिला अश्या दोनही भारतीय संघांनी विश्वकप जिंकला आहे.
हभप तुकाराम बाबा म्हणाले,गेल्या काही वर्षांमध्ये प्रो- कबड्डी सामन्यांमुळे या खेळाला नवसंजिवनी मिळाली आहे, मोठमोठे कलाकार आपापल्या टिम विकत घेत आहेत या जरी या खेळाकरता सकारात्मक गोष्टी घडत असल्या तरी या झगमगाटात पारंपारिक पध्दतीने खेळली जाणारी कबड्डी जगली आणि तगली पाहीजे,त्यामुळे ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रमाणात कब्बडी स्पर्धाचे आयोजन व्हावे.
बसवराज पाटील म्हणाले, कब्बडी ग्रामीण भागातील तरूणाचे वैभव होते,पारपांरिक खेळ विसरले जात आहेत. त्याला ग्रामीण भागात टिकवून ठेवावे,असे प्रयत्न आहेत.