रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांवर आता फौजदारी | शासनाचे आदेश | ग्रामपंचायतीमार्फत बजावणार नोटिस

0
जत
संकेत टाइम्स

भर रस्त्यावर जनावरे बांधून वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांना आता सावध व्हावे लागेल. कारण रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्यांना ग्रामपंचायतीमार्फत नोटीस बजावली जाणार असून दखल न घेतल्यास फौजदारी कारवाई करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.राज्य शासनाने कोट्यवधी रुपये खर्चुन ग्रामीण नागरिकांच्या सोईसाठी रस्ते तयार केले; मात्र काहींनी रस्त्यांवर जनाघरे बांधून याहतुकीस अडथळा निर्माण केला आहे.

 

 

संबंधितांना ग्रामपंचायतींनी नोटीस बजावल्यानंतरही रस्त्यावर जनावरे बांधलीच तर आता फौजदारी कारवाईस तोंड द्यावे लागणार आहे.तालुक्यात रस्त्यावर जनावरे बांधणाऱ्या गायांचा संख्या शेकडो आहे.आता कारवाईकरिता ग्रामपंचायत पुढाकार घेणार आहे.केंद्र व राज्य शासनाच्यावतीने ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यात येतो. दहा वर्षापूर्वी गावरस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय होती. आज गल्लोगल्ली विविध मेंढी योजनेतून काँक्रीट रस्ते निर्माण करण्यात आले आहेत.

 

 

Rate Card
परंतु या रस्त्याचा उपयोग दरबारी आता पशुपालक गाय, म्हैस, बैल,शेळी,मेंढी बांधण्याकरिता करीत असल्याच्या अनेक तक्रारी शासन दरबारी आहेत.विशेष म्हणजे गावात जाणाऱ्या रस्त्यांच्या बाजूला खुंट्याला जनावरे बांधलेली असल्यामुळे सकाळी व संध्याकाळी या रस्त्याने चालणे अवघड झाले आहे.यामुळे अनेकवेळा या रस्त्यावर दुचाकी चालकांचे अपघात झाल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. घराशेजारी जागा असतानाही सीमेंट रस्त्यावर जनावरे बांधण्याचे प्रकार वाढले आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधींना काही ग्रामस्थ जुमानत नसल्यामुळे हे अतिक्रम वाढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.