डफळापूर,संकेत टाइम्स : डफळापूर ग्रामपंचायतीच्या येत्या निवडणूकीत आम्ही नव्या विचाराचे स्वतंत्र पँनेल उभे करणार असून गावच्या विकासाच्या निर्णायक भूमिकेत असू,असे मत माजी उपसंरपच तानाजी चव्हाण सरकार यांनी संकेत टाइम्सशी बोलताना व्यक्त केले.
डफळापूर तालुक्यातील मोठे गाव आहे.येथे झपाट्याने विकास होण्याची गरज होती.मात्र सत्ताधारी विकास करण्यात अपयशी ठरले आहेत.रस्ते,गटारी,स्वच्छता, नागरिकांचे जिव्हाळ्याचे प्रश्नावर सातत्याने ओरड आहे.
खरेतर गावाची लोंकसंख्या आलेला निधी व विकासकामे याबाबत मोठी अनियमितता आहे.त्यामुळे विकास खंगला आहे.आम्ही सत्तेत असताना नागरिकांच्या हिताचा कारभार केला होता.त्यामुळे येत्या निवडणूकीत तरूण,उच्च शिक्षित,व गावासाठी काहीतरी करण्याची महत्वाकांक्षा असणाऱ्या तरूणांना घेऊन सक्षम पर्याय देणार आहोत.
अनेक तरूणांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे. लवकरचं आमच्या विचाराच्या तरूण,बुर्जूग नागरिकांची बैठक घेऊन पुढील दिशा ठरविणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
तानाजी चव्हाण नावाचा दमदार नेतागेल्या दहा वर्षापुर्वी तानाजी चव्हाण सरकार यांना माननारा मोठा वर्ग तयार केला आहे. शिवसेनातून आपल्या राजकीय आयुष्यास सुरूवात केलेले चव्हाण जत पश्चिम भागातील दमदार नेता म्हणून परिचित आहेत.ग्रामपंचायतीत उपसंरपच म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले आहे. गेल्या पाच वर्षात ते राजकीय प्रवाहाबाहेर होते,मात्र येत्या निवडणूकीत ताकतीने पुढे येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.