जत‌ तालुक्यात शिवसेनेला गतवैभव आणायचे आहे ; दिनकर पतंगे

0
बिळूर : जत तालुक्यात शिवसेनाला गतवैभव आणायचे आहे.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांचे जत तालुक्यावर विशेष लक्ष असून शिवसेना भविष्यात तालुक्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवू शकते,असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांनी केले.

 

Rate Card

 

 

दसरा शुभमुहूर्तावर बिळूर येथील
मेळाव्यामध्ये विविध पक्षातून शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना श्री.पंतगे यांच्याहस्ते शिवबंधन बांधून सर्वांचा सत्कार करण्यात आला.
बिळूर शिवसेना कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

 

श्री.बसवेश्वर यांच्या पुतळ्यास पष्पहार घालून पूजा करण्यात आली.तद्नंतर मोठ्या जल्लोषात महादेव मंदिरात सभा घेण्यात आली.या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिवसैनिक लवकुमार करेनवार होते.

 

 

महाराष्ट्र कामगार सेना तालुकाध्यक्ष सुरेश घोडके,जत शहर प्रमुख रोहित पवार उपस्थित होते.यावेळी बाळासो शिंदे यांची बिळूर शाखाप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.

 

 

श्री.पंतगे म्हणाले, जत तालुक्यात शिवसेना वाढीस चांगले पोषक वातावरण तयार झालेले आहे.अनेक कार्यकर्ते शिवसेनेत येऊ लागलेले आहेत.प्रत्येक शिवसैनिक हा कट्टर,कडवट अभ्यासू जिद्दीचा चिकाटीचा आणि प्रयत्नवादी असणे आवश्यक आहे.

 

 

पंतगे म्हणाले, प्रत्येक शिवसैनिकाने समाजाचे हित लक्षात घेऊन विकासाचे समाजकारण करावे.स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितल्या प्रमाणे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे गुणसूत्र लक्षात ठेवावे.
बिळूर येथील शिवसेनेच्या कार्यकर्ता शिबिरात उपस्थित ग्रामस्थ

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.