जत,संकेत टाइम्स : जत- डफळापूर मार्गावरील चौथा मैल येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. तर अन्य चौघांना किरकोळ दुखापत झाली आहे.अशोक पांढरे (रा.कुडणूर),सजोत संजय नाथ (रा.डफळापूर) असे गंभीर जखमी झालेल्याची नावे आहेत.याप्रकरणी रात्री उशिरापर्यत जत पोलीसात गुन्हा दाखल नव्हता.
