अमित मखिजा टोळी सांगली,सातारा, कोल्हापूर व सोलापूर जिल्हयातुन तडीपार

0
सांगली : विश्रामबाग ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार अमित सुदाम मखिजा टोळीला जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षित गेडाम यांनी सांगली, सातारा,कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्हयातून २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.

 

विश्रामबाग, सांगली शहर, रत्नागिरी शहर तसेच राजारामपूरी पोलीस ठाणे जि.कोल्हापूर पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये यातील हद्दपारी टोळी प्रमुख अमित सुदाम मखिजा, (वय २९,वर्षे, रा. मंदाकिनी आपार्टमेंट, विश्रामबाग सांगली) अखिलेश उर्फ लिब्या महेश दरुरमठ, (वय २८ वर्षे, रा. चांदणी चौक, सांगली) सुमित सुदाम मखिजा,(वय २७ वर्षे,रा. मंदाकिनी आपार्टमेंट,विश्रामबाग सांगली) ऋषीकेश प्रकाश आरगे, (वय २४ वर्षे, रा. दत्तनगर मार्ग क्र. १४, विश्रामबाग सांगली) या टोळीविरुद्ध सन २०१५ ते २०२१ मध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून प्राणघातक हत्याराने मारहाण करणे, शिवीगाळी करणे, चोरी करणे, इच्छापूर्वक दुखापत करुन जबरी चोरी करणे,फसवणूक, घातक हत्यारानी इच्छापुर्वक दुखापत पोहचवणे, बलात्कार करणे असे १३ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

 

 

नमुद सामनेवाले हे कायदा न जुमाननारे आहेत. त्यामुळे या टोळी विरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी पोलीस अधीक्षक, सांगली यांना प्रस्ताव सादर केला होता.सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक, सांगली यांनी अवलोकन करुन, चौकशी अधिकारी तथा उप विभागीय पोलीस अधिकारी, शहर विभाग सांगली यांचा चौकशी अहवाल, टोळीविरुध्द दाखल असलेल्या गुन्हयांचा व सद्यस्थितीचा अहवाल तसेच त्यांच्या हालचाली, प्रस्तावाची सुनावणील दरम्यान टोळी प्रमुख याचेवर दाखल असणारा बलात्काराचा गंभीर गुन्हा या बाबी विचारात घेऊन, नैसर्गिक न्यायतत्वांचा व्यापक विचार करुन अमित सुदाम मखिजा टोळीला पोलीस अधिनियम सन १९५१ चे कलम ५५ मधील तरतुदीनुसार सांगली,सातारा, कोल्हापूर व सोलापूर या चार जिल्हयातुन २ वर्षे कालावधीकरिता तडीपारी आदेश पारीत केला आहे.

 

 

Rate Card
सदर कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक, श्री. दिक्षीत गेडाम, अपर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड,स्था.गु.अ.शाखा सांगली, पो.नि.कल्लाप्पा पुजारी,सपोफो सिध्दाप्या रुपनर, पोकॉ दिपक गट्टे स्था.गु.अ.शाखा सांगली, पोहेकॉ अदिनाथ माने, मुंडे, पोकॉ ऋतुराज होळकरयांनी भाग घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.