डांबर नव्हे,काळे आईल टाकून डांबरीकरण | तालुक्यातील सर्वच रस्त्याची त्रयस्थ यंत्रणेकडून तपासणी करावी

0
5

जत : जत‌ तालुक्यात नगरपरिषद,जिल्हा परिषद व बांधकाम विभागाकडे असणाऱ्या रस्त्याचे खडीकरण, मुरुमीकरण, डांबरीकरण, खड्डे भरण्याचे कामे मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहेत; पण कामे निकृष्ट दर्जाची करून ठेकेदार डांबराऐवजी ऑईलमिश्रित डांबर टाकून चुना लावत असल्याने खड्डे पुन्हा जैसेथे होत आहेत.डांबरीकरणानंतर काही तासात काळे आईल टाकून टाकलेली छोटी खड्डी उखडत आहे.रस्ते कामातील भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येत असतानाही तालुक्यातील लोकप्रतिनिधीची चुप्पी अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. 

 

भल्यामोठ्या जत‌ तालुक्यात नगरपरिषद, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने विविध रस्त्यांवर लाखो रुपयाची कामे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या वतीने व सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने सुरू असलेल्या अनेक रस्त्याच्या कामाचे खडीकरण, डांबरीकरण, खड्डे मुजवून कामे सुरू आहेत. डांबरी रस्त्यावरील खड्डे मुजवताना डांबर कमी अन् खडी जादा टाकली जात असल्याने एका आठवड्यात ‘जैसे थे’ परिस्थिती होत आहे. त्यामुळे वाहनधारकांचे कंबरडे मोडत आहे.

कामाची दर्जा निकृष्ट….

जतचे बांधकाम विभाग,नगरपरिषद,जिल्हा परिषदेकडून अनेक रस्त्यांची कामे ठेकेदारामार्फत कोट्यवधी रुपये खर्च केले जातात; पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ते खड्ड्यात जातात.जत तालुक्यात गेल्या काही दिवसात नव्याने डांबरीकरण केलेेले रस्ते उखडले आहेत.त्यामुळे या रस्त्याची भ्रष्ट गुणनिंयत्रक नव्हे तर त्रयस्ट वरिष्ठ अधिकाऱ्यांची कमिटी नेमून तपासणी करण्याची मागणी होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here