वाचतो तो वाचतो

0

शिक्षणाची पहिली पायरी म्हणजे वाचन. जीवनकौशल्य वाचनाने प्राप्त होतात. उत्तम वक्तृत्व, उत्तम लेखन, उत्तम व्यक्तिमत्त्व, हे वाचनानेच मिळते. बुध्दीची एकाग्रता माणसाला, वाचकाला समाधान देते. विचाराची प्रगल्भता, संस्कृती संवर्धन आणि मूल्यांची जपणूक वाचनातून होते. चरित्रग्रंथ वाचन प्रेरक असते. त्यातून आनंद मिळतो. ऐतिहासिक ग्रंथ भूतकाळात फिरवून आणतात. भूगोलातून विश्‍व समजते. आध्यात्मिक वाचनाने मनाला उभारी येते. शातंता मिळते. काव्यवाचनाने रसिकता मिळते. स्वामी विवेकानंद यांच्या वाचनाने उर्जा मिळते. संत ज्ञानदेवाच्या ग्रथांच्या वाचनातून सृजणत्व येते. विकास टप्पे कळतात अंतस्त्रावात मधुरता येते.

 

वाचे बरवे कवित्व कवित्वी बरवे रसिकत्व, वाचन केवळ मनाचा विरंगुळा नव्हे. आत्मशोध आणि आत्मबोध याचे साधन आहे. मानवाचे चतुरस्त्र होणे, मनाची मशागत करणे यासाठी वाचन आवश्यक आहे. मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवते ते औषध म्हणजे वाचन. अविष्कार आणि कल्पकता वाचनाने मिळते. आधुनिक युगाची सुखाची गुरुकिल्ली म्हणजे वाचन. वाचन ही चळवळच झाली पाहिजे. मानवाला भविष्याशी भूत आणि वर्तमानाशी जोडणारा दुवा म्हणजे वाचन. वाचून शिकवण आचरणात आणणे गरजेचे. आयुर्वेद आणि विज्ञान जगाच्या कल्याणासाठी वाचायला हवेत. इतिहास, वारसा संस्कृती मानवी कल्याणाच्या प्रगतीची बिजे वाचनातून मिळतात. वाचाल तर वाचाल ही म्हण आजच्या घडीला सर्मपक आहे.

 

 

आज वाचन अल्प आहे कारण साधने अनेक आहेत. वाचन समृध्द असेल तर लेखन प्रकृती प्रबल होते. कल्पना शक्तीला वाव मिळतो. रसिकता वाढीस लागते. मानुषतेचे बळ अंगी लागते. सामाजिक जाणीव दृढ होते. अस्तित्वाचे मोल कळते. वाचन संस्कृतीचा मोठा वारसा राज्याला लाभलेला आहे. सार्वजनिक ग्रंथालयाला दोनशे अधिक वर्षाहून इतिहास आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात कोल्हापूर संस्थानामध्ये छत्रपतींनी आपल्या जनतेला सुजाण करण्यासाठी १९४५ साली पहिला सार्वजनिक कायदा केला. त्यांचे हे पाऊल सांस्कृतिक क्षेत्रात आदर्श निर्माण करणारे ठरते. १९६७मध्ये राज्यात महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये कायदा मंजूर करण्यात आला. व्यक्ती ,समाज आणि राष्ट्र उभारणीत ग्रंथ योगदान महत्त्वाचे आहे.

 

 

संस्कारासाठी प्रभावी माध्यम वाचन अमेरिकेतल्या समाजशास्त्राच्या प्राध्यापिका वेंडी ग्रिस वोल्ह ह्या आपल्या पुस्तकात वाचनसंस्कृतीची व्याख्या करताना म्हणतात की जो समाज सांस्कृतिक सक्षमता आणि आर्थिक यशासाठी पुस्तक वाचनाची क्षमता आणि सराव ही अनिवार्य गरज मानतो तो वाचन संस्कृती असलेला समाज ओळखला जातो. काळानुसार, वयानुसार वैचारिक वाचनाची व्याप्ती वाढवणे गरजेचे आहे. काळाप्रमाणे वाचन संस्कृती बदलेल पण नष्ट होणार नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे.

Rate Card

 

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाचनाचे महत्त्व आहे आणि तेअगदी शाळेपासूनच विदित होते. मनुष्याजवळ असलेले ज्ञान ही त्याची फार मोठी शक्ती आहे. ती वाचनाने मिळते. हुशारी आणि चपळता वाचनानेच साध्य होते. त्याकरिता प्रत्येक व्यक्तीच्या मनात वाचनाची आवड निर्माण होणे गरजेचे आहे. वाचन संस्कृती टिकली पाहिजे असे म्हटले जाते. वाचन समृध्द केले तर टिकेलच. वाचाल तर वाचाल. मेंदूला चालना मिळते, शब्दात प्रगती होते, माहिती आणि ज्ञानात भर पडते, नव्हे शब्द संपत्ती विकसित होते. अर्थात सर्व साहित्य प्रकार कळतात. वाचन करत असताना लेखकाचे म्हणणे आपण ऐकत असतो. वाचन हे आपले सोबती आहे. ते मित्र आणि गुरूची भूमिका करतात. वार्धक्यात ते संकटकाळी अनेक ठिकाणी मदत करतात. म्हणूनच समर्थ रामदास स्वामी यांनी म्हटले आहे-दिसामाजी काही तरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचीत जावे.

 

 

मच्छिंद्र ऐनापुरे,जत जि. सांगली

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.