वाळू तस्करी रोकणारी कारवाई थंडावली | जत तालुक्यातील चित्र : नवे अधिकारी बाहेर पडेनात

0
Rate Card

जत : जत तालुक्यातील महसूल यंत्रणा कारवाईचा फार्स करत असल्याने जत तालुक्यात वाळू तस्करीच्या माध्यमातून शासनाला दररोज लाखो रुपयांच्या महसुलाचा गंडा घातला जात आहे. या काळ्या सोन्याच्या लुटीतून वाळू तस्कर शासनाला कोट्यवधींचा चुना लावून घरावर सोन्याची कौले चढविताना दिसत आहेत.

त्यामुळे जत तालुक्यातील वाळू उपशाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे.दरम्यान दंडात्मक कारवाई ही तोंडे बघून केली जात असल्याची चर्चा आहे.तर गेल्या काही दिवसात कारवाईच थांबल्याचे चित्र आहे.जत पुर्व भागात दुष्काळी परिस्थीतीत गेल्या काही वर्षांपासून वाळू तस्करी हा एक नवीनच काळा धंदा सुरू झाला आहे. या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे.या वाळू तस्कर खुशाल उत्पन्न मिळवत आहेत तर शासनाचे दुहेरी नुकसान होत आहे.

त्यात महसूल तर बुडतोच आहे.पंरतू या वाळूच्या अवजड वाहतूकीमुळे रस्त्यांची पुर्ती वाट लागली असून नव्याने केलेल्या रस्तेही चार महिन्यात जैसेथे स्थितीत येत आहेत.जत तालुक्यातील वाळूचा एकही ठिकाणचे वाळू लिलाव नसताना जत तालुक्यात सध्या स्थितीत शेकडो बांधकामे सुरू आहेत.बांधकाम ठिकाणी वाळूचे मोठाले ढिगारे किती मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी चालते यांचे जिंवत उदाहरण आहेत.आणि याला कुणाचे अभय आहे.हे जगजाहीरच आहे.असे असताना जत महसूल विभागाचे पथके रात्रभर वाळू तस्करी करणारे वाहने धुडाळंत असतात.

वाळू तस्करीमध्ये इतका अफाट पैसा आहे की या माध्यमातून ओढे व नदीकाठावरील काही अधिकारी,अनेक गावगुंड रंकाचे राव झाले आहेत. कालपर्यंत ज्यांच्या पायात चपलेचा थांगपत्ता नव्हता अशी मंडळी आता वातानुकुलीत चारचाकीतून फिरताना दिसत आहेत. वाळू तस्करी ही जत तालुक्यातील काही ठराविक लोकांची मक्तेदारी होवून बसली आहे.

परिघाबाहेचा कुणी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करताच साम, दाम, दंड, भेद वापरून त्याला हाकलून लावले जाते.जत तालुक्यातील लिलाव झालेल्या प्लॉटना अजून प्रशासनाने प्रत्यक्षात उपशासाठी लिलावच झालेला नाही, असे असताना तालुकाभर सर्वत्र वाळूची वाहतूक मात्र राजरोसपणे चालू आहे. जत पूर्वभागातील दोड्डनाला प्रकल्प, बोरनदी, सुसलाद, संख मध्यम प्रकल्प, अशी काही ठिकाणे आजकाल वाळू तस्करीची केंद्रस्थाने झालेली आहेत.

संबंधित गावातील तलाठी, मंडल अधिकारी, संबंधित तालुक्याचे तहसीलदार यांच्यावर ही जबाबदारी निश्‍चित असते. मात्र आजकाल या महसूल विभागातील अधिकाऱ्याच्या नाकावर ठेचून वाळू तस्करी सुरू आहे.या प्रकारांना  त्या त्या भागातील नेमके कोण जबाबदार आहेत, ते वेगळे सांगण्याची गरज नाही. वाळू तस्कर मोठ्या उत्पन्नातून गबरगंड बनले आहेत.

त्यामुळे त्यांच्या व्यवसायात आड येणारे अधिकारी, ओढ्यालगतच्या शेतकऱ्यावर हल्ले करून दहशत माजविण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक तस्करावर गुन्हे दाखल आहेत मात्र: एकाही वाळू तस्करांना सजा झाल्याचे ऐकवत नाही. अखंड वाळू तस्करीने प्रशासनही हातबल ठरत आहे.

जत तालुक्यात वाळू तस्करी रोकणारी यंत्रणा कोमात गेली आहे. त्यामुळे दिवसाढवळ्या वाळूच्या गाड्या भरून शहरातून भरून जात असूनही त्याकडे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शासकीय सुट्टीच्या वाळू तस्करीला बहर येतो. दिवसभरात अनेक डंम्पर जत तालुक्यातील विविध मार्गावरून धावतात.

जत पुर्व भागातील भोर नदीपात्रा लगत असे वाळू ढिगारे नित्याचे असतात. तरीही महसूल विभागाला हे दिसत नाहीत हे विशेष

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.