‘अनफिट’ ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे धोकादायक ऊस वाहतूक !

0
जत : शेतीकामासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीचे ‘पासिंग’ शासनाने 1997 पासून बंद केले आहे. त्यामुळे ट्रॉलीनिर्मिती केल्यानंतर फक्त एकदाच ‘पासिंग’ करण्यात येत असल्यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ‘अनफिट’ ट्रॉलीद्वारे बेसुमार वजनाची ऊस वाहतूक केली जात असल्याने अपघातांची मालिका सुरू झाली आहे. ऊस ट्रॅक्टर, ट्रॉली, बैलगाड्यांना ‘रिफ्लेक्टर’ नसल्याने जिल्ह्यात वाहने धडकून अपघात होण्यास गळीत हंगाम सुरू होताच सुरूवात झाली आहे.

 

 

 

 

शासनाने ट्रॅक्टर-ट्रॉलींचे वर्गीकरण ट्रान्सपोटर्र् व्हेईकल संवर्गातून नॉन ट्रॉन्सपोर्टमध्ये केले आहे. त्यामुळे दरवर्षी करण्यात येणारे ट्रॉलीचे पासिंग बंद झाले आहे. ट्रॉलीनिर्मिती झाल्यानंतर एकदाच पासिंग केल्यानंतर वर्षानुवर्षे ‘अनफिट’ ट्रॉलीद्वारे वाहतूक केली जात आहे. त्यामुळे अपघातांची मालिका कायम असल्याचे चित्र दिसून आले आहे.शेती संवर्गातील वाहनांचे दरवर्षी होणारे पासिंग बंद केल्यामुळे ट्रॉलीची वहन क्षमता, रिफ्लेक्टर, टायरची तपासणी होत नाही.

 

 

 

परिणामी अपघाताचा आलेख वाढला आहे. मोटार वाहन कायद्याने ट्रॉलीच्या पासिंगनुसार 4 ते 7 टनांपर्यंत ऊस वाहतूक करता येऊ शकते. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश ऊस वाहतूकदारांकडून एकाच ट्रॉलीद्वारे जास्तीत जास्त टनांची वाहतूक केली जात आहे.

 

 

 

अनफिट ट्रॉलींमुळे अपघातांची मालिका

राज्यातील सर्वाधिक साखर कारखान्यांची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री विविध रस्त्यांवरून फिटनेस नसलेल्या असंख्य ट्रॉलींद्वारे ऊस वाहतूक केली जाते. रिफ्लेक्टर नसणे, क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणे, अनुभवी चालक नसल्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघातांची मालिका सुरू आहे.

 

ऊस वाहतूकदारांनी हे करावेच

ट्रॉलीला चहूबाजूंनी रिफ्लेक्टर (अंधारात चमकणारे रेडियम) लावावे.मर्यादेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करू नये.ऊस वाहतूकीपूर्वी वाहनांच्या टायरची हवा तपासावी.अचानक वळण घेऊ नका.ट्रॉलीला इंडिकेटर बसवा.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.