जत: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ,मुंबई आयोजित ‘मध्यान्ह भोजन आहार योजना’ या योजनेचा १९ ऑक्टोबर रोजी किस्मत चौक येथील बांधकाम कामगार कार्यालयात प्रारंभ करण्यात आला. या ‘मध्यान्ह भोजन आहार योजना’ मार्फत दररोज दोन हजार कामगारांना दुपारचे जेवण पोहचवण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र अल्पसंख्याक कल्याण समिती सदस्य व बांधकाम कामगार संघटनेचे नेते सलीम गवंडी यांनी दिली.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते सुरेशराव शिंदे, तालुकाध्यक्ष रमेश पाटील, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष संजय सांवत,अमित दुधाळ सागर शिनगारे,हर्षद गंवडी,दीपक पाच्छापूरे,सुनील शिखरे,बापू वाघमोडे उपस्थित होते.