उमराणी,बिळूर परिसरात रब्बी पिके कोमेजली

0
उमराणी,संकेत टाइम्स : जत तालुक्‍यात पावसाने ओढ दिली आहे.त्यामुळे जत दक्षिण भागातील उमराणी,बिळूर,खोजानवाडी,बसरगी,सिंदूर या भागातील चांगले उत्पन्न देणारी तूर पिकासह खरिपाची पिके अक्षरशः करपून गेली.खरीपातही अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही, तरीही आशावाद जीवंत ठेवत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील तूर, ज्वारीची पेरणी केली आहे. निसर्गाने कितीही हुलकावण्या दिल्यातरी आपल्यातील आशावाद जीवंत ठेवणारा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
दिवसभर कडक ऊन पडत आहे. तरीही काळ्या आईची ओटी भरली पाहिजे या भावनेने शेतकऱ्यांनी तूरीसह ज्वारीची पेरणी केली आहे.या भागात जुन, जुलै,ऑगस्ट,संप्टेबर महिन्यात अत्यल्प पाऊस झाला आहे.15 सप्टेंबरच्या आसपास काहीभागात थोडा पाऊस झाला.त्या ओलीवरचं शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे.

 

तूर व ज्वारीच्या उत्पादनात जत तालुका अग्रेसर आहे. या भागातील ज्वारीला कोल्हापूर,सांगली,सातारा भागात विशेष मागणी आहे.10-15 दिवसांत पाऊस झाला नाही तर पेरलेले बी मातीत जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.