उमदी पोलीसांना मटका एंजन्ट सापडला

0
5
चंदनाची लागवड करा,भरघोस उत्पन्न मिळवा रोपासाठी वरील नंबरवर फोन करा
चंदनाची लागवड करा,भरघोस उत्पन्न मिळवा रोपासाठी वरील नंबरवर फोन करा

उमदी,संकेत टाइम्स : उमदी पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्याची चर्चा विधानसभेपर्यत पोहचली आहे.मात्र तरीही अवैध धंदे बंद होण्याचे नाव घेत नसल्याचे वास्तव आहे.

 

येथे मिळकतीचे आकडे तूफान असल्याने एकही अधिकारी त्यावर कारवाई करण्याचे धाडस करत नाहीत.वृत्तमानपत्रे,सामाजिक संघटना,नेते यांनी एकादा आरोप केला.तर मग मात्र पोलीसाकडून कारवाईचे सोपस्कर पुर्ण करण्याचे धाडस केले जाते.आताही तसाच प्रकार घडला आहे,गेल्या काही दिवसात संकेत टाइम्सने यावर प्रकाशझोत टाकल्यानंतर कारवाईचे सोपस्कर पुर्ण केले जात आहे.

 

 

बुधवारी उमदी बाजार पेठेत झाडाच्या आडोशाला बसून मटका घेणारा एंजन्ट मदगोंडा शिवशंकर ममदापुरे रा.उमदी या उमदी पोलीसांनी पकडले आहे.त्याकडे १४५० रूपये रोख,मटका आकडे लिहलेला एक कागद,पेन असा मुद्देमाल जप्त केला आहे. सा.पो.नि.पंकज पवार यांना तब्बल महिन्यानंतर उमदी मटका सुरू असल्याबाबत माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here