आदेश निघाले,शासकीय कार्यालयात मास्क वापरणे बंधनकारक | विनामास्क आढळल्यास 200 रूपये दंड

0

 

सांगली :  राज्य शासनाकडील आदेशानुसार राज्यातील सर्व शासकीय / निमशासकीय, खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये मास्कचा वापर बंधनकारक करणे तसेच कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये व राज्य शासनाकडील दिलेल्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

 

 

 

(१)       जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांसाठी कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पध्दतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील.

 

 

(२)       जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय कार्यालये व खाजगी आस्थापनामध्ये कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांच्या कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा सबंधित कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख / आस्थापना प्रमुख यांनी करावी व कोव्हीड प्रतिबंधात्मक पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र सबंधित अधिकारी / कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे. ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून कार्यालयीन अधिकारी / कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

 

 

 

(३)       सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापना यांनी दैनंदिन कामकाजादरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणे, यावर देखरेख करण्यासाठी सबंधित विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा एका अधिकाऱ्याला नामनिर्देशित करतील.

 

 

Rate Card

(४)       सर्व कार्यालय व कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क वावरणाऱ्या अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी यांना सबंधित अभ्यागत / कर्मचारी / अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात / आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी (कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेला अधिकारी) दंड (जिल्हाधिकारी कार्यालयाकडील आदेश क्र.गृह-1/कार्या-6/कोरोना-आरआर-832/2021 दि. 15 सप्टेंबर 2020 प्रमाणे 200 रूपये इतका दंड) करण्यास सक्षम प्राधिकारी राहील.

 

 

(५)       सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यागत / कर्मचारी / अधिकाऱ्यांना वरीलप्रमाणे दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधित कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी सदर दंडाची रक्कम “महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल (एक) सर्वसाधारण सेवा ००७० – इतर प्रशासनिक सेवा ८०० इतर जमा रक्कम  (Revenue Receipt (c) Other non – Tax Revenue (I) General Services 0070 – Other Administrative Services 800 Other Receipts)” या लेखाशीर्षाखालील जमा सांकेतांकाखाली जमा करेल.

 

 

वरीलप्रमाणे कार्यवाही करणे हि सबंधित शासकीय/  निमशासकीय कार्यालयांच्या बाबतीत कार्यालय प्रमुख यांची जबाबदारी राहील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जारी केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.