माजी सैनिकांनी स्टेट बँक ऑफ इंडियात सुरक्षा रक्षक पदासाठी जिल्हा सैनिक कार्यालयात २ नोव्हेंबर पर्यंत नाव नोंदवावे

0
3

सांगली :  स्टेट बँक ऑफ इंडिया ने कळविल्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये माजी सैनिक प्रवर्गातून महाराष्ट्र राज्यात एकूण ७ हजार ४२५ सुरक्षा रक्षक (Bank Guard) नियुक्त करावयाचे आहेत. त्या अनुषंगाने या पदाकरीता इच्छुक सैन्यदलातून सेवानिवृत्त झालेल्या व पात्रता पूर्ण करत असलेल्या सांगली जिल्ह्यातील माजी सैनिकांनी लवकरात लवकर व कोणत्याही परिस्थितीत दिनांक 2 नोव्हेंबर 2021 पर्यंत डिस्चार्ज बुक, ओळख पत्र, इम्पलॉयमेंट कार्डसह जिल्हा सैनिक कार्यालयात प्रत्यक्ष भेट देवून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कर्नल प्रदीप ढोले (सेवा निवृत्त) यांनी केले आहे.

 

सुरक्षा रक्षक पदासाठी  पात्रता पुढीलप्रमाणे आहे. वय 1 ऑक्टोबर 2021 ला 45 वर्षापेक्षा कमी असावे. कमीत कमी 8 वी पास पण 12 वी पास नसावा, सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15 वर्षे असावी. सैन्य दलातील हुद्दा जास्तीत जास्त हवालदार आणि त्यापेक्षा खालचा असावा. सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी चांगले (GOOD) असावे तसेच मेडिकल कॅटेगरी AYE/SHAPE1 असावी.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here