समीर वानखेडे जन्माने मुस्लिम(?) | SC प्रवर्गावर मिळवलेली नोकरी काढून घ्यावी आर.पी.आय डेमोक्रॅटिक ची मागणी

0

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे जन्माने मुसलमान असल्याचे दिसून आले असल्याने त्यांनी शासनाची दिशाभूल करून मिळवलेली नोकरी काढून घ्यावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ. राजन माकणीकर यांनी पक्षाच्या वतीने केली आहे.

 

समीर वानखेडे यांनी अनुसूचित जातीचे बोगस प्रमाणपत्र मिळवून NCB ची नोकरी मिळवली असल्याचे समजत असून याप्रकरणी अनुसूचित आयोगाकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक च्या वस्तीने तक्रार दाखल केली आहे.

 

गुरुवार 7 दिसेम्बर 2006 रात्री 8 वाजता समीर दाऊद वानखेडे आणि शबाना कुरेशी यांचा निकाह लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी पश्चिमेला झाला असून काजी मुजजमिल अहेमद यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांचा निकाह लावल्याचे कबुल केले आहे.

 

मात्र; जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत समीर वानखेडे यांना नोकरीतून कमी करून नजर कैदेत ठेवण्यात यावे म्हणजे चौकशी करिता सोपं होईल.

 

चौकशी ना करता अधिकाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रकार घाडल्यास पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा ही पक्षाच्या वतीने कायदेविषयक महाराष्ट्र राज्य विभाग प्रमुख सुप्रसिद्ध विधिज्ञ नितीन माने यांनी दिला.

Rate Card
shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.