मिरज येथे‌ सिनर्जी लायन्स क्लबची स्थापना

0
उमदी : आंतरराष्ट्रीय लायन संघटना 3234 डी 1 मधील रिजन 3 मध्ये सिनर्जी लायन्स कल्ब मिरज या नुतन लायन्स क्लबचा उद्घाटन सोहळा प्रांतपाल सुनिल सुतार व माजी प्रांतपाल जगदिश पुरोहित, रिजन चेअरमन डॉ.रविंद्र हत्तळी,कल्ब विस्तार अधिकारी डॉ.रविंद्र आरळी,जत लायन्स क्लबच्या अध्यक्षा सौ.सुरेखा पतंगे,झोन चेअरमन श्री.कुंभार सर यांच्या उपस्थित संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक डॉ.रविंद्र आरळी यांनी केले तर सिनर्जी लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहसीनखान पठाण व त्याच्या सर्व  नुतन सदस्यांना माजी प्रांतपाल जगदिश पुरोहित यांनी शपत देत पदग्रहण सोहळा पार पाडला.

 

 

यावेळी मिसेस इंडिया या स्पर्धेमध्ये यश मिळविलेल्या डॉ.प्रज्वला चितवाडगी ( झळकी) व महाराष्ट्र राज्य भारतीय जनता पार्टीच्या वैद्यकिय सेलच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले डॉ.रविंद्र आरळी,रिजन सेक्रटरी घनशाम चौगुले यांना डॉ.कलाम राष्ट्र उभारणी प्रेरणा पुरस्कार मिळाल्या बद्दल प्रांतपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सुत्रसंचलन प्रा.घनशाम चौगुले व डॉ.विद्या यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.