डफळापूर, संकेत टाइम्स : बेंळूखी (ता.जत) येथील ग्रामसेवक सुरेश दत्ता कुंभार यांचा सेवानिवृत्ती निमित्त सहपत्नी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.तर नुतन ग्रामसेवक राजेश ननवरे यांचे स्वागत करण्यात आला.
कुंभार हे ३१ ऑक्टोंबर रोजी सेवानिवृत्त झाले.गेल्या तीन वर्षापासून ते बेंळूखी येथे सेवा बजावत होते.कुंभार यांनी कवटेमहांकाळ तालुक्यातील घोरपडी येथून नोकरीस सुरूवात केली होती.चुडेखिंडी,मोघमवाडी,अंकले, डोर्ली,जिरग्याळ, बेंळूखी येथे नोकरी केली.विशेष म्हणजे अंकले येथे १० वर्षे,जिरग्याळ येथे ९ वर्षे अशी सर्वाधिक काळ सेवा बजावली.
मंगळवारी बेंळूखी ग्रामस्थांच्या वतीने छोटेखानी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामसेवक सुरेश कुंभार यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ,गिप्ट वस्तू देऊन माजी संरपच शामराव चव्हाण तर त्यांच्या पत्नी रेखा कुंभार यांचा ग्रा.पं.सदस्य कमल चव्हाण यांच्याहस्ते तर नुतन ग्रामसवेक राजेश ननवरे माजी संरपच संजय पाटील यांनी सत्कार केला.
यावेळी विद्यमान संरपच संभाजी कदम,
माजी संरपच धोंडीराम चंदनशिवे,पोलीस पाटील बाबासाहेब शिंगाडे,उपसंरपच सदाशिव चंदनशिवे,ग्रा.प.सदस्य चंद्रकात चव्हाण,मारूती माळी,अशोक माळी,रमेश चव्हाण,विजय चव्हाण, राजू चव्हाण,शिवाजी चंदनशिवे,शिंगू अनुशे,शिवाजी चंदनशिवे,रामचंद्र पाटील,धनाजी चव्हाण,विलास चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना सुरेश कुंभार म्हणाले,बेंळूखी गावातील पदाधिकारी, नागरिकांनी चांगले सहकार्य केले.
बेंळूखी येथे ग्रामसेवक सुरेश कुंभार यांचा सत्कार करण्यात आला.