उमदी पोलीसाचा धाक कमी होतोय ? | कायदा धाब्यावर : मध्यरात्री वाहने अडवून वसूली

0
7
जत : जत तालुक्यातील महत्वाचे असणारे पुर्व भागातील उमदी पोलीस ठाण्यातील चिरीमिरी ला भुललेल्या झारीतील शुक्राचार्यांच्या मतलबीपणामुळे बेकायदा धंद्याला बाळसे आले आहे.

 

 

 

 

ठाण्याच्या हद्दीत कायदा हा विषय फक्त सविंधानातच असल्याचे समोर येत आहे.शाळकरी मुले असे नियमबाह्य वागत असतील तर पोलीसाचा धाक कोणावर,हा संशोधनाचा मुद्दा आहे.हद्दीतील एकही गाव सापडणार नाही ते थे अवैध धंदे नाहीत.

 

 

 

 

सर्वत्र परवाना दिल्यासारखे मटका,जुगार,दारू अड्डे,सावकारी,वाळू,गांज्या,चंदन तस्करी सुरू आहे.येथे येणारे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी येथील अवैध धंदे चालकांच्या कलेने चालत असल्याची चर्चा आहे.यासाठी खास मांडवली करणारी  टीम कार्यरत आहे.तेच सर्व प्रकरणे तडजोडीसाठी मध्यस्थी करत असल्याचे आरोप आहेत.

रात्रीच्या तपासणीची चर्चा

उमदी,संख हद्दीतून मोठ्या प्रमाणात वाळू,गाज्या,चंदन तस्करी होत आहे.हा कारभार रात्रभर सुरू असतो.काही पोलीस कर्मचारी गाड्याची तपासणी करतात.मात्र पोलीस असल्याचे भासवत अनेक महत्वाच्या रस्त्यावर पोलीस ठाण्यात वावरणारे काहीजण लूटमार करत असल्याची चर्चा सुरू आहे.

 

 

 

स्थानिक कर्मचारी वसूलीवर
उमदी पोलीस ठाण्याकडील अनेक स्थानिक कर्मचारी अनेक वर्षापासून अवैध धंद्यातील वसूलीच्या मोहिमेवर आहेत.त्यांच्याकडून लाखो रूपयाची मिळकत गोळा केली जात असल्याची चर्चा आहे.बऱ्याच ठिकाणच्या मिळकतीची वरिष्ठांनाही कल्पना नसल्याची चर्चा असून या वसूली कलेक्टरांनी गेल्या काही वर्षातील झालेली बरकत अधिकाऱ्यांच्या मिळकतीच्या पुढे गेल्याचे समोर येत आहे. त्यामुळे ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालावे,अशी मागणी होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here