जत : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेत बहुसंख्य शिक्षकांनी पूर्ण क्षमतने कर्ज घेतले आहे.इतर बँकेच्या तुलनेत शिक्षक बँकेचा व्याजाचा दर जादा आहे.व्याजदर जादा असल्यामुळे अनेक शिक्षक सभासदांना याचा मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.व्याजाचा दर जादा असल्यामुळे शिक्षकांत सत्ताधाऱ्यां विरुद्ध असंतोष पसरला आहे.
बँकेने जादा नफा मिळवून टॅक्स, इतर अनावशक्य खर्च करून सभासदांची पिळवणूक करण्यापेक्षा,नफा कमी मिळलातर चालेल पण सर्व कर्जावर व्याज दर कमी म्हणजे एक अंकी करावा,अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे शि.द.तालुका अध्यक्ष भारत क्षिरसागर यांनी केली.
यावेळी संघाचे सरचिटणीस गुंडा मुंजे,कार्याध्यक्ष तानाजी टेंगले,उपाध्यक्ष भगवान वाघमोडे, कोषाध्यक्ष उत्तम लेंगरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.