जतेत पॉवर टान्सफॉर्म बदलण्याचे काम युध्दपातळीवर सुरू

0
जत,संकेत टाइम्स : जत शहराला विज पुरवठा करणारा पॉवर टान्सफॉर्म दुरूस्तीचे काम महावितरण कडून गतीने सुरू आहे.सध्या फेल गेलेला टान्सफॉर्म ‌काढण्याचे काम अतिंम टप्यात आहे.नविन टान्सफॉर्म बसविण्यासाठी अजून पाच दिवस लागणार आहेत.

 

 

नवा टान्सफार्म पुण्याहून येणार आहे.
जत शहरासह लगतच्या गावांना तात्पुर्ता विज पुरवठा सुरू केला आहे. मात्र अद्याप विद्युत मोटारी सुरू होतील असा विज पुरवठा सुरू नसल्याने पाणी टंचाईचा फटका बसत आहे.शहरातील नागरिकांचे पाण्यामुळे हाल होत आहे.उच्च दाबाने विजपुरठा झाल्याशिवाय शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

 

 

 

दरम्यान महावितरणचे सर्व अधिकारी,कर्मचारी सध्या युध्दपातळीवर काम करत‌ आहेत.
तरीही शहरातील विद्युत पुरवठा पुढील पाच दिवस अनियंत्रित असणार आहे.काही तास लोड शेंडिगही जत कराना सहन करावे लागत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.