सराफ बाजाराला चमक ; दसरा- दिवाळीत पाच कोटींची उलाढाल

0
Rate Card
जत : कोरोनामुळे मागील दीड वर्षांपासून खरेदीसाठी बाहेर न पडलेल्या ग्राहकांनी यंदाच्या दिवाळीत सोने व चांदीची तुफान खरेदी केली आहे. मागील आठ दिवस सलग सराफ गल्लीत ग्राहकांची झुंबड दिसली. ऐन दिवाळीत ग्राहकांची चकाकी लाभल्याने सराफ व्यावसायिक समाधानी दिसले.पंधरा दिवसात तब्बल पाच कोटींची उलाढाल सराफ गल्लीत झाल्याची माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली आहे.

 

 

 

जत शहरातील श्रीराम ज्वेलर्स,बंडगर ज्वेलर्स,सराफ असोसिएशन कडून चारचाकी,दुचाकीसह अनेक बक्षिसाच्या योजना ठेवल्याने सोने खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  विशेष म्हणजे ऐन दिवाळीत लग्नसराईची खरेदी होत आहे.

 

 

सोने आणि चांदीत गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढला आहे. त्यामुळे शुभमुहूर्ताचे निमित्त साधून अनेक जण सोने व चांदी खरेदी करतात. यंदाच्या दिवाळीत बहुतांश ग्राहकांनी सोने आणि चांदी खरेदीला पसंती दिली आहे.

 

 

 

पाटल्या, सोनेरी बांगड्या, अंगठ्या, सोनसाखळ्या, नेकलेस, राणीहार, ब्रेसलेट, तोडे, मंगळसूत्र तसेच सोन्याची बिस्कीटे खरेदीला ग्राहकांनी अधिक पसंती दिली आहे.

तुळशी विवाहनंतर सलग सात महिने विवाहाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे सोने व चांदी खरेदीला सुरुवात झाली आहे. यंदाची दसरा, दिवाळी चांगली गेली असून लग्नसराईची खरेदी देखील चांगली होईल, अशी अपेक्षा आहे.दुर्योधन कोडग, आंवढीकर

सराफ व्यावसायिक

 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.