जत : वातावरणात बदल झाल्याने सर्दी, खोकला व तापाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक रुग्ण हे तपासणीसाठी रुग्णालयात जात आहेत. तपासणीसाठी रुग्णालयात रांगा लागल्या असताना बहुतांश रुग्णांना डॉक्टर कोरोना तपासणीचा सल्ला देत नाहीत.
कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. तरीही घरोघरी सर्दी, खोकला, घसा दुखीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आहेत. ही सर्व लक्षणे कोरोनाची देखील आहेत. या परिस्थितीत कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. सध्या शहरात कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन होताना दिसत नाही. अनेक नागरिक हे मास्कविना फिरत असून फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळत नाहीत.
वातावरण बदलासोबतच दिवाळीनंतर सर्दी, खोकला रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात असली तरी या नियमांचे पालन होत नाही. अशातच डॉक्टरही कोरोना चाचणीचा सल्ला देत नाहीत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कमी असला तरी त्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु शहरातील अनेक खासगी डॉक्टरांकडून या चाचणीचा सल्लाच रुग्णांना दिला जात नाही.