जत : जत तालूक्यातील जत शहरासह मोठ्या गावातील वाढती रहदारी, भरधाव वाहने, खराब व अरुंद रस्ते, वाहतुकीच्या नियमांच्या पालनाचा अभाव या सर्व समस्यांमुळे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तिशीतील युवक वर्ग ,महाविद्यालयीन तरुण धूम स्टाईलने वाहने वेगात चालवीत मृत्यूला आमंत्रण देत आहेत. पालकांचे दुर्लक्ष, शाळा-महाविद्यालयांत मार्गदर्शनाचा अभाव आणि वाहतूक पोलिसांची वाहतुकीच्या प्रश्नावर तात्पुरती मलमपट्टी अशा कारणांनी तरुणासह सामान्य जनतेचा हकनाक बळी जात आहे. काहीवेळा अपघातात चूक दुसऱ्याची व बळी तिसऱ्याचा जाण्याची प्रकरणेही वाढली आहेत.
सध्या अनेक परदेशी कंपन्यांच्या बाईक्सची तरुणांत क्रेझ आली आहे. नव नविन दुचाकी व चारचाकी गाड्या शहरासह अनेक गावातील रस्त्यावर सुसाट जात असल्याचे पहावयास मिळते. तसेच महाविद्यालयीन तरुण व मध्यम वर्गीय तिशीतील युवक मोबाईलवर बोलत, रस्त्याने ये-जा करणार्या तरुणींवर इम्प्रेशन पाडण्यासाठी धूम स्टाईलने बेशिस्तपणे वाहने चालविताना दिसतात. केवळ हलगर्जीपणामुळे लाखमोलाचा जीव तरुण पणास लावत आहेत. त्यांना वेळीच रोखण्यासाठी पालक किंवा पोलीस प्रयत्न करीत नसल्याचे दिसून येते.जत तालूक्यातील उखडलेले व अतिक्रमणे होऊन छोटे झालेले रस्ते, गेल्या कित्येक वर्षोपासून दुरूस्थी न झालेल्या अशा रस्त्यामुळे अनेक अपघाताना निंमत्रण ठरत आहेत . वाहनांची वाढलेली संख्या यामुळे वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत आहे.
रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पार्किंग नसतानाही वाहने अस्ताव्यस्त उभी केली जातात. त्यामुळे वाहनधारकाला समोरच्या वाहनाला ओलांडून जाताना अपघाताला सामोरे जावे लागते. ही वाहने हटविण्याची कोणतेही विभाग जबाबदारी घेत नाहीत ; परिणामी कारवाई होत नाही या कारणाने सतत असे गाड्या पार्किंगचे प्रकार वाढत आहे.नुसता वाहतूक सप्ताह साजरा करून उपयोग नाही; त्याची अमलबजावणी संबधित विभागाकडून होणे गरजेचे आहे. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई होणे गरजेचे, वाहतुकीची स्वयंशिस्त पाळली पाहिजे,
वाहतुकीच्या नियमांचे प्रत्येकाने स्वत:च्या घरापासून पालन केले पाहिजे, वाहनाची वेगर्मयादा सांभाळली पाहिजे, सध्या तरुणाई धूम स्टाईलने दुचाकी वाहने चालवीत आहे ,त्यामुळे महाविद्यालयात त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. अशा मर्यादा पाळल्यातर अपघाताची संख्या कमी होईल. त्यासाठी सर्वानी स्वत: चा जीवाचे मोल ओळखून वाहने चालविने गरजचे आहे.