जत तालुक्यात बनावट दारू संपवतेय अनेकांचे जीवन
कारवाईचे काही काळ चित्र रगंविले जाते.त्यानंतर काही दिवस दारू बंद परत येरे माझ्या मागल्या अशी स्थिती असते.कठोर कारवाई नसल्याने अशी परिस्थिती आहे.संबधित विभागाकडून केलेल्या कारवाईत बऱ्याच वेळा मिटवामिटवीचे प्रकार जादा असतात.कारवाईची माहितीही माध्यमाना दिली जात नाही.दारू अडे उद् वस्त केले ऐवढेच कळते पंरतू कोणाला अटक करून कारवाई केल्याचे ऐकवत नाही .परिणामी अशा दारूने दारू काढणाऱ्या बरोबरच अनेक ग्राहकाच्या कुंटुंबात पण कायम अंधकार पऱसरलेला आसतो.पोलीस उत्पादन शुल्कची डोळेझाक
जत तालुक्यात बनावट दारूची मोठ्या प्रमाणात विक्री होत असताना पोलीस,राज्य उत्पादन शुल्कला अशा बनावट शिंदी,गावठी ,ब्रँड झालेल्या दारूस आळा घालण्यात पुर्णत: अपयश आले आहे. पत्यक्षात अशा अवैध दारू विक्रीवर धाडी पडतात पंरतू कोणावरही कारवाई झाल्याचे ऐकवत नाही. या अर्थपुर्ण कारण आसण्याची शक्यता नाकारता येत नाही.