जत शहरात डासांचा उच्छाद | फॉगिंग मशीन, धुरळणीचा पत्ता नाही !

0

जत : जत शहराच्या कानाकोपऱ्यात घाणीचे ढीग व तुंबलेल्या पाण्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. डासांमुळे नागरिकांना विविध आजाराने ग्रासले असताना पालिकेच्या मलेरिया विभागाकडून अद्याप फवारणी व धुरळणी केलेली नाही. डासांच्या  समस्येवर आरोग्य विभागाचा हवेत गोळीबार सुरू असल्यामुळे शहरातील सत्तर हजार लोकसंख्येचा जीव धोक्यात असल्याचे दिसून येत आहे.
शहराच्या विविध भागात पाणी तुंबले असून, खुल्या भूखंडांवर सांडपाणी साचून आहे. साफसफाईच्या कामांचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्यामुळे प्रभागांमध्ये ठिकठिकाणी घाणीचे ढीग साचले आहेत.

 

परिणामी डासांची पैदास वाढली असून, नागरिकांना नानाविध आजारांचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. डोकेदुखी, अंगदुखी, खोकला, सर्दी व तापेने अकोलेकर फणफणल्याचे चित्र आहे. जतकराचे धोक्यात असले तरी पालिकेच्या आरोग्य विभागाला सोयरसुतक नसल्याचे दिसून येते. हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार वाढला. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, साचलेले पाणी व डासांमुळे नागरिक त्रस्त आहेत. पावसाळा आणि हिवाळ्यात आरोग्य विभागाने शहरात नियमीत धुरळणी आणि फवारणी करणे क्रमप्राप्त आहे.विकास कामांचा गवगवा करणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी जतकरांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

धुरळणी, फवारणी कोणत्या प्रभागात?
मलेरिया (हिवताप)चे डास आढळल्यास घराच्या कानाकोपऱ्यात, नाल्या, सर्व्हिस लाइन, खुले भूखंड, वाढलेली झुडपे आदी ठिकाणी फवारणी करणे क्रमप्राप्त आहे. तसेच हवेतील कीटकांचा नाश करण्यासाठी धुरळणी करण्याची गरज आहे.

Rate Card
नगरसेवक झोपेत; जतकरांचे मरण
सांडपाणी, घाणीमुळे प्रत्येक प्रभागात डासांची पैदास वाढली असताना सर्वपक्षीय नगरसेवक झोपा काढत आहेत का, असा नागरिक उपस्थित करू लागले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून धुरळणी, फवारणीचा पत्ताच नसल्याचे नागरिक सांगतात.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.