जत,उमदी पोलीसांना अवैध धंदे दिसेनात

0
जत : गेल्या कित्येक महिन्यांपासून चोरून सुरू असलेल्या जुगार आणि मटक्याचे पुन्हा पेव फुटल्याचे चित्र आहे.पोलिस प्रमुखांचे विशेष पथक, गुन्हे शाखा पथक व स्थानिक पोलीस मिळकतीला सोकावल्याने मटका आणि जुगार त्यांना डोळ्याला दिसत हे विशेष आहे.जत शहरात उघड्यावर मटका व्यवसाय सुरू असल्याचेच चित्र आहे. पोलीसाच्या आश्रयाच्या नावाखाली, जागोजागी कोपर्‍यात राजरोसपणे जुगार सुरू असल्याचे चित्र आहे.

 

 

विशेष पथकाने आतापर्यंत अनेक ठिकाणी कारवाई केल्याचे समोर आले आहे.तेथे पुन्हा नव्याने अवैद्य धंदे सुरू आहेत.पैशांच्या जोरावर अधिकारी आणि त्यांच्या मर्जीतल्या खास लोकांना हाताशी धरून गरिबांना लुटण्याचा व्यवसाय सुरू आहे. नंतर सिस्टिम आणि विधी विभागाचे कारण देऊन गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केली जाते.तालुकाभर राजरोसपणे सुरू असलेल्या मटका,जूगार अड्ड्यावर विशेष म्हणजे‌ गेल्या दोन महिन्यात एकाही मटका एंजन्ट,जूगार अडड्यावर कारवाई केलेली नाही.

 

 

 

Rate Card
परिणामी मटका, जुगार, सावकारकी अवैध व्यवसाय करणार्‍यांचे प्रमाण वाढले आहे. अवैध व्यवसायाचे कंबरडे मोडण्याचे काम यापुर्वी होत होते.मात्र आता काही झारीतील शुक्राचार्य मात्र या व्यावसायिकांचे आधारस्तंभ बनले आहेत. या झारीतील शुक्राचार्यांचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. शहरातील आजी-माजी विद्यमान लोकप्रतिनिधींचा जुगार आणि मटक्यासह अन्य अवैध व्यवसायांना राजाश्रय मिळत असल्याची चर्चा आहे. याला काही लोकप्रतिनिधींचा छुपा पाठिंबा असल्यानेच जुगार, मटका आणि सावकारांनी पुन्हा डोके वर काढले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.