उमदी पोलीसांची अखेर अवैध धंद्यावर कारवाई | संखात तीनपानी जूगार,करजगीत बेकायदा दारू,बेंळोडगीत मटका अड्ड्यावर छापा

0
जत,संकेत टाइम्स : उमदी पोलीसांच्या अवैध धंद्याला पाठबळ असल्याचे अनेक वेळा सिध्द झाले आहे.आताही तेच समोर आले आहे.गेल्या चार दिवसापासून दैनिक संकेत टाइम्सने अवैध धंदे कसे सुरू असतात,यांचा भांडाफोड करताच उमदी पोलीसांनी अवैध धंदे चालकांवर कारवाईचा बगडा उचलला आहे.

 

 

 

रवीवारी संख,करजगी,बेंळोडगी येथील जूगार,मटका,बेकायदा दारू चालकावर कारवाई करून रोखड जप्त केली.करजगी येथे अनेक दिवसापासून वसूली कलेक्टरच्या आशिवार्दाने सुरू असलेल्या बेकायदा देशी दारू अड्ड्यावर छापा टाकत कारवाईचे सोपस्कर पुर्ण केले आहे.

 

 

 

यापुढे कारवाईत किती सातत्य राहणार हा संशोधनाचा विषय आहे. अन्यथा वसूली कलेक्टरांचा आकडा दुप्पट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.बेंळोडगी ता.जत येथे अनेक दिवसापासून सुरू असलेल्या मटका अड्डयावर अखेर उमदी पोलीसांनी छापा टाकत मलकारी महादेव बोर्गीकर याला पकडत ६४५ रूपये जप्त केले.

 

 

Rate Card
करजगी येथे गेल्या अनेक दिवसापासून सुरू असलेल्या गौसपीर इस्माइल व्हसपेठी यांच्या दारू अड्ड्यावर छापा टाकत २२२० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

 

 

 

तर संख येथे पोलीसांच्या हप्तेबाजीने सुरू असलेल्या जूगार अड्ड्यावर अखेर जड अंतकरणाने उमदी पोलीसांनी छापा टाकला. यात शिवाण्णा कोरे,सचिन मठपती,सुरेश नरूटे या जुगाऱ्यांना रोखड व साहित्यासह पकडण्यात आले आहे.

 

 

 

पोलीसांनी गेल्या चार महिन्यात प्रथमच अशा कारवाया केल्या आहे.त्यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.