जतेत अवैध धंद्याचा विळखा | पुन्हा नवे कलेक्टर नेमले ; पोलीसाचा पांठिबा की परवाना
जत,संकेत टाइम्स : कोरोनाचा प्रभाव कमी होताच जत तालुक्यात अवैध मटका,अवैध दारु,सिंदीचे गुत्ते,जुगार अड्डे बहरले आहेत.जत पोलीस ठाण्यातील नवीन अधिकाऱ्यांचे नव्याचे नऊ दिवस संपले असून मोठा हप्ता घेऊन या अवैध धंद्याला किंबहुना कोरोना वाढीला पोलीस बळ देत आहेत.अवैध धंद्याचा उत्तम कारभार लाखोची कमाई करणार बनला असून तब्बल चार वसूली कलेक्टर नेमल्याची चर्चा सुरू आहे.
