किमयागार ते किंगमेकर,जतच्या
राजकारणातील भिष्माचार्य नेते,
हत्तीची चाल, वजिराचा रुबाब कायम ठेवलेले गेली चार दशके जत तालुक्यात राजकारण करणारे अनेक कार्यकर्त्यांना घडविणारे शक्तिमान नेते म्हणून पुन्हा माजी आमदार विलासराव जगताप यांचे तालुक्यातील वर्चस्व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूकीनंतर स्पष्ट झाले आहे.
पंचायत समिती सदस्य पासून राजकीय आयुष्य सुरू केलेले जगताप यांनी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, जत कारखान्याचे दिर्घकाळ चेअरमन,जिल्हा बँकेचे चेअरमन,शिखर बँकेचे संचालक,आमदार अशा पदावर काम केलेच,शिवाय आपल्या सामान्य कार्यकर्त्याला तालुका, जिल्हा पातळीवरील अनेक पदे मिळवून देत किमयागार,किंगमेकर ठरले आहेत.
बेधडक बोलणे,चूकीला चूक व बरोबरला बरोबर म्हणणारा नेता.स्व:ताचे नुकसान झाले तरी झालेल मात्र आपली बेधडक भूमिका कायम ठेवलेले भाजपाचे जतचे माजी आमदार जिल्हा मध्यवर्ती बँकेत कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष,आमदार विक्रमसिंह सांवत यांचा करेक्ट कार्यक्रम करत प्रकाश जमदाडे या आपल्या जून्या कार्यकर्त्याला निवडून आणल्याने पुन्हा राज्यात चर्चेत आले आहेत.
आपल्या बेधडक स्वभावामुळे माजी आमदार विलासराव जगताप राज्यात परिचित आहेत.कधीही तोंडातून गेलेला शंब्द ते फिरवत नाहीत,अशी त्यांची खासियत आहे.गेल्या चार दशकात त्यांनी मधूकर कांबळे या सायकाल दुरूस्ती दुकानदाराला जतचे आमदार केले.तासगाव येथून जतेत आलेले सुरेश खाडे यांना आमदार करण्यात विलासराव जगताप किंग ठरले होते.
पांडोझरीचे जिल्हा परिषद सदस्य आण्णासाहेब गडदे यांना एका रात्रीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनविण्याची त्यांनी किमया साधली.उमदीच्या रेश्माका होर्तीकर यांनाही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.
त्याशिवाय रोजगार हमी मजूर असलेले प्रकाश जमदाडे यांना सांगली बाजार समितीचे सभापती,त्यांच्या पत्नी मंगलताई जमदाडे यांना पंचायत समितीच्या सभापती व आता थेट जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक करण्याची किमया त्यांनी करून दाखविली आहे.
तम्मणगौडा रवीपाटील,सुनिता पवार,यांना जिल्हा परिषदेचे सभापती पदे मिळवून देत किंगमेकर असल्याचे स्पष्ट केले आहे.या शिवाय सांगली जिल्हा परिषद,सांगली लोकसभा,जत पंचायत समितीत सत्ता आणण्यात आमदार विलासराव जगताप यांची भूमिका सर्वोत्तम होती.
माजी मंत्री पंतगराव कदम,आर.आर.पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष होता.निव्वळ बेधडक बोलण्यामुळे त्यांचे अनेक नेत्यांची खटके उडाले,त्यांना रोकण्यासाठीही अनेक प्रयत्न झाले मात्र ते कालही व आजही निर्विवाद जत तालुक्याचे किंगमेकरचं आहेत.